Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?

पुणे विभागातील हजारो प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून, महाविद्यालयांना तात्काळ पडताळणी करून अर्ज शून्यावर आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 07:27 PM
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीचे तब्बल 5 हजार अर्ज प्रलंबित; तात्काळ पडताळणी अन्…; आदेशात नेमके काय?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे विभागात हजारो अर्ज प्रलंबित
शिष्यवृतीचे तब्बल ५ हजार ३३९ अर्ज प्रलंबित
उच्च शिक्षण सहसंचालकांचे आदेश

सोनाजी गाढवे /पुणे: शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाईन अर्जांची महाविद्यालय स्तरावर तात्काळ पडताळणी करून प्रलंबित अर्ज शून्यावर आणावेत, असे स्पष्ट निर्देश उच्च शिक्षण सहसंचालक, पुणे विभाग यांनी दिले आहेत. चालू वर्षात तब्बल ५ हजार ३३९ अर्ज प्रलंबित तर दुसऱ्या टप्यातील ६१९ अर्ज प्रलंबित आहेत. याबाबत १६ फेब्रुवारी रोजी आदेश काढण्यात आले असून, त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित सर्व महाविद्यालयांना परिपत्रक जारी केले आहे.

सहसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजीच्या डॅशबोर्ड अहवालानुसार पुणे विभागातील महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने अर्ज प्रलंबित राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आर्थिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आता Maharashtra सरकारची जबाबदारी; शासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

एकंदरीत, पुणे विभागातील हजारो प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून, महाविद्यालयांना तात्काळ पडताळणी करून अर्ज शून्यावर आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आता महाविद्यालये या आदेशांची कितपत प्रभावी अंमलबजावणी करतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

पुणे विद्यापीठांचेही महाविद्यालयांना निर्देश

या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपल्या संलग्न महाविद्यालयांना स्वतंत्र परिपत्रक काढून उच्च शिक्षण सहसंचालकांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे.

स्पष्ट सूचना- अर्ज प्रलंबित राहू नयेत

-महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दररोज तपासावेत.

-कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवू नयेत.

-विद्यार्थ्यांनी अर्जाची छायाप्रत (हार्ड कॉपी) महाविद्यालयात जमा केली नसली तरी ऑनलाईन अर्जांची स्क्रुटिनी करून पुढील स्तरावर पाठवावेत.

-आवश्यक असल्यास महाविद्यालयांनी अर्ज तपासणीसाठी विशेष शिबिरे/कॅम्प आयोजित करावेत.

-केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सहसंचालक कार्यालयास ई-मेलद्वारे पाठवावा.

या प्रामुख्याने या महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना आदेश

प्राचार्य, सर्व अशासकीय अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुतानित वरिष्ठ कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षण शास्त्र, शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्याले, पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्हा तसेच केंद्रशासित प्रतेश दादर नगर हवेली. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डक्केन महाविद्याल व पदव्युत्तर संस्था पुणे, गोखले अर्थशास्त्र व राज्याशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, श्रीमती नथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक या विद्यापीठाच्या कुलसचिवांना प्रलंबीत अर्ज पडताळणी करण्यास सांगीतले आहे.

पसंतीची शाळा निवडण्यावर मर्यादा! पालकांमध्ये नाराजी, RTI अंतर्गत प्रवेश ठरतंय गैरफायदेशीर?

महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज

चालू शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये तब्बल ५३३९ अर्ज प्रलंबित

वर्ष  –  पहिला हप्ता –  दुसरा हप्ता

२०१९-२० – १२७ – २६७

२०२०-२१ – ७८ – २५६

२०२१-२२ –  ७५ – १४०

२०२२-२३ –  ९२ – ४१६

२०२३-२४ –  १८७ – ४१६

२०२४-२५ –  ५६४ – २९६४

२०२५-२६ –  ५३३९ – ६१९

Web Title: Joint director higher education orders verification of 5000 pending applications for student scholarships pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • Pune University

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.