Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

Pune University: आंदोलनादरम्यान शिक्षण विभागाचे विभागप्रमुख, मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर, सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सुरक्षा रक्षक आणि वसतिगृह प्रशासनाला जाब विचारत, तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 12, 2026 | 09:24 PM
Pune University

Pune University

Follow Us
Follow Us:
  • पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न
  • ३०० हून अधिक विद्यार्थिनी रस्त्यावर
  • पहाटे ३.२५ वाजता वसतिगृहाचे गेट उघडून विद्यार्थिनींच्या घोषणा
Pune University: शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थिनीची माफी मागावी, ‘आम्हाला न्याय हवा’, ‘आम्हाला माफी हवी’, अशा घोषणा देत सुरू झालेले हे आंदोलन मध्यरात्रीनंतर अधिक तीव्र झाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्षण विभागातील काही विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत, संबंधित विद्यार्थ्यांनी माफी मागावी आणि मुलींच्या सुरक्षिततेची खात्री द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आंदोलन सुरू केले. पहाटे ३.२५ च्या सुमारास ३०० हून अधिक विद्यार्थिनी वसतिगृह बाहेर पडून रस्त्यावर उतरल्या. या वेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेविरोधात घोषणाबाजी केली. काही विद्यार्थिनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यातही पोहोचल्याची माहिती आहे.

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या बाहेर विद्यापीठाच्याच दोन विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थिनीची अनुचित चौकशी करून भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थिनींनी एकत्र येऊन कुलगुरूंची भेट घेऊन कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन दिले आहे. विद्यापीठाने शिक्षण विभागाच्या प्रमुख गीता शिंदे यांच्यावर मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे.

विभाग प्रमुख, रेक्टर आणि सुरक्षा यंत्रणेला जाब

आंदोलनादरम्यान शिक्षण विभागाचे विभागप्रमुख, मुलींच्या वसतिगृहाच्या रेक्टर, सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी तसेच पोलीस उपस्थित होते. विद्यार्थिनींनी सुरक्षा रक्षक आणि वसतिगृह प्रशासनाला जाब विचारत, तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. संबंधित विद्यार्थिनीला न्याय मिळावा, दोषारोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आंदोलकांची भूमिका होती.

चौकशी करून दोषींविरूध्द कडक कारवाई

“विद्यापीठ आवारात विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यापीठाने सदर बाब गांभिर्याने घेतली आहे. त्या अनुषंगाने सदर विद्यार्थ्यांविरूध्द विद्यापीठामार्फत पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत असून त्या दोन्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभागातील व वसतिगृहातील प्रवेश तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकाराची कुलगुरूंनी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल.” असे जनसंपर्क अधिकारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी कळवीले.

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

“चर्चा आणि अंतर्गत बैठकांनंतर, आम्ही मुलींच्या वसतिगृहाचे सहाय्यक मुख्य रेक्टर प्रवीण तलअत यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आम्हाला मुख्य रेक्टर सोनिया नागराळे यांचा राजीनामा प्राप्त झाला आणि तो आम्ही स्वीकारला. आता कठोर उपाययोजना केल्या जातील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक कायदेशीर समितीही स्थापन करत आहोत आणि यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.”

प्रा. डॉ. सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: A male student harassing a female student at pune university crime police news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune University
  • women safety

संबंधित बातम्या

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात
1

मिया बाय तनिष्कचे पुण्यात नवे स्टोअर; जंगली महाराज रोडवर फेस्टिव्ह सीझनची शानदार सुरुवात

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
2

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
4

Pune Murder : मध्यस्थी करायला गेला अन् जीव गमावला; पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.