
जुन्नर वनविभाग 'बिबट्यांचे आशियाई केंद्र'! (Photo Credit - X)
गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. चिमुरड्या मुलांपासून ते वृद्ध महिलांपर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. बिबटे आता जंगलापुरते मर्यादित न राहता गावागावातील वाड्या, शिवार आणि रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर बिबट्यांच्या हालचाली कुत्र्याप्रमाणे सामान्य झाल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
शेतात काम करणारे शेतकरी, शाळा-कॉलेजला जाणारी मुले आणि रात्री प्रवास करणारे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. परिणामी, ग्रामीण भागामधील जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असून, अनेक गावांमध्ये रात्री वावर बंदी लागू करण्याची वेळ आली आहे.
Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट
स्थानिक नागरिक आणि प्रतिनिधींनी या परिस्थितीवर तीव्र टीका केली आहे:
बिबट्यांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी माणसांचे रक्षण कोण करणार? हा प्रश्न स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे. या गंभीर स्थितीवर सरकारकडे योग्य नियोजन आणि ठोस उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली असून, वनविभागावर तीव्र टीका होत आहे. वनविभागाकडून पिंजरे लावणे, जनजागृती करणे, आणि अधिवास सुधारणा यांसारखे प्रयत्न सुरू असले तरी समस्या सुटण्याचे नाव घेत नाही.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी