 
        
        ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी (फोटो- सोशल मीडिया)
शेततळ्यांसाठी १३ हजार ३०४ अर्ज प्राप्त झाले 
कृषी समृद्धी योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्राप्त 
२० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्याची शक्यता
पुणे: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (एमआयडीएच) आणि राज्य सरकारच्या कृषी समृद्धी योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टलवर सामूहिक शेततळ्यांसाठी १३ हजार ३०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये छाननीअंती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार ९ हजार १२अर्जधारकांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळी उभारल्यास राज्यात नव्याने सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येण्याची अपेक्षित आहे.
अवकाळीने हिरावला हातचा घास
तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०८ शेतकऱ्यांचे सुमारे ९३.०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. तालुक्यात मे ते सप्टेंबर या पाच महिन्याच्या कालावधीतही पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात एकूण ४७.७५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीची नोंद झाली होती. त्यापैकी जून ते ऑगस्ट महिन्यातही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर अखेर पासून सुरू झालेल्या अवेळी पावसामुळे नुकतेच कापणीला आलेले भातपिक पुन्हा बाधित झाले आहे. गेल्या आठवड्याभरात संध्याकाळच्या सरीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके आडवी झाली. तर काही ठिकाणी भाताचे रोप पूर्ण तुटून चिखलात गेली आहेत.






