Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Konkan News: ‘सह्याद्री वाचवायचा असेल तर…’; ‘’कोंकणी रानमाणसा’ने सांगितला संवर्धनाचा नवा मंत्र

Konkan: तरुणांना समाजमाध्यमांवरील केवळ ‘स्क्रोलिंग’पुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवरील प्रश्नांशी जोडण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली. कोकणाची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 02:35 AM
कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे

कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे

Follow Us
Follow Us:
  • ‘आम्ही सह्याद्रीचे राखणदार आहोत, निर्माते नाही’ – प्रसाद गावडे
  • वृक्षारोपणापेक्षा स्थानिक जैवविविधता, शेती आणि लोकसंस्कृती जपण्यावर भर
  • निसर्ग जपण्याचा आमचा प्रयत्न – प्रसाद गावडे 
सुनयना सोनवणे / पुणे: ‘आम्ही सह्याद्रीचे राखणदार आहोत, निर्माते नाही. त्यामुळे नवी झाडे लावण्यापेक्षा अस्तित्वात असलेली झाडे, स्थानिक जैवविविधता आणि निसर्ग जपण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ अशी भूमिका रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्गचे संस्थापक प्रसाद गावडे यांनी मांडली. सह्याद्रीचे संवर्धन केवळ वृक्षारोपणापुरते मर्यादित न ठेवता स्थानिकांची शेती, लोकसंस्कृती, जैवविविधता आणि जगण्याचे प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचा सूर ‘मी सह्याद्रीचा राखणदार’ या चर्चासत्रात उमटला.

रानमाणूस फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात प्रसाद गावडे, सत्यजित चव्हाण, अविनाश उषा वसंत, स्वप्नील तोंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सह्याद्री आणि कोकणातील प्रश्नांवर भूमिका मांडली. दुर्गेश काळे यांच्या सुरेल गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश खुटवड यांनी सूत्रसंचालन केले.

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

तरुणांना समाजमाध्यमांवरील केवळ ‘स्क्रोलिंग’पुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जमिनीवरील प्रश्नांशी जोडण्याची गरज गावडे यांनी व्यक्त केली. कोकणाची लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणे आवश्यक आहे. ‘कोकण सुंदर दिसावे म्हणून नव्हे, तर ते आमचे घर आहे, आम्ही तिथे राहतो म्हणून ते वाचवायचे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाषेवर आधारित शिक्षण देण्यापेक्षा संस्कृती आणि स्थानिक जीवनशैली जपणारे शिक्षण देणे सध्या गरजेचे आहे असेही मत गावडे यांनी व्यक्त केले.

पुण्याच्या आसपासच्या सह्याद्रीतील गावांसह कोकणात विकासाच्या नावाखाली होत असलेला ऱ्हास, अतिक्रमणे आणि त्याचा स्थानिक शेतकरी व नागरिकांना बसणारा फटका याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘राखणदार यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. यात्रेचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, आतापर्यंत सुमारे ४० गावांतून प्रवास करून हजारो नागरिकांशी संवाद साधला आहे. यात्रेचा चौथा टप्पा पालघर जिल्ह्यात होणार असल्याची माहितीही स्वप्नील तोंडे यांनी दिली.

सत्यजित चव्हाण यांनी पर्यावरणातील संवेदनशील क्षेत्रांकडे स्थानिकांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. पश्चिम घाटातील जैवविविधता जपत विकासकामे करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक असून, स्थानिक प्रजाती, माती, कातळशिल्पे आणि पारंपरिक परिसंस्था जपणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती

कोकणातील प्रस्तावित मोठ्या प्रकल्पांबाबतही यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. स्थानिक संसाधने आणि गरजा बाजूला ठेवून बाहेरून विकासाचे प्रारूप आणले जाते, तेव्हा त्याचा लाभ नेमका कोणाला होतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत चर्चेत व्यक्त करण्यात आले. चर्चासत्राला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

Web Title: Kokani ranmanus prasad gawde said we are protectors of sahyadri not creators enviornment news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • Kokan News
  • Konkan News
  • navarashtra special

संबंधित बातम्या

Go For A Ride Day : रोजच्या धावपळीतून घ्या छोटासा ब्रेक; जाणून घ्या 22 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘गो फॉर अ राइड डे’?
1

Go For A Ride Day : रोजच्या धावपळीतून घ्या छोटासा ब्रेक; जाणून घ्या 22 नोव्हेंबरला का साजरा केला जातो ‘गो फॉर अ राइड डे’?

World Silambam Day: केवळ काठी फिरवण्याची कला नाही, तर हा आहे भारताचा प्राचीन युद्धवारसा; जाणून घ्या ‘सिलंबम’चे महत्त्व
2

World Silambam Day: केवळ काठी फिरवण्याची कला नाही, तर हा आहे भारताचा प्राचीन युद्धवारसा; जाणून घ्या ‘सिलंबम’चे महत्त्व

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा नवा धडा
3

Navarashtra Special: नातवंडे झाली शिक्षक, आजी-आजोबा विद्यार्थी! घराघरांत रंगतोय स्मार्टफोन शिकण्याचा नवा धडा

Africa Industrialization Day: नैसर्गिक संपत्तीने नटलेला आफ्रिका आता बनणार जागतिक औद्योगिक महासत्ता; वाचा 20 नोव्हेंबरचे महत्त्व
4

Africa Industrialization Day: नैसर्गिक संपत्तीने नटलेला आफ्रिका आता बनणार जागतिक औद्योगिक महासत्ता; वाचा 20 नोव्हेंबरचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.