उद्योगमंत्री उदय सामंत (फोटो- सोशल मीडिया)
कोकणात ३ लाख कोटींचे ११ करार
डिजिटल इन्फ्रासारखे उद्योगांचा समावेश
दावोस, पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांची माहिती
रत्नागिरी: दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३७ कोटी २७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली असून कोकणात ३ लाख कोटींचे ११ करार झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहे. पहिल्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे करार झाले होते. मागील दोन दिवसात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटींची करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.
डिजिटल इन्फ्रासारखे उद्योगांचा समावेश
आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यानी स्पष्ट वोले, त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहे. यामध्ये एमआयडीसीसीबतव एमएमआरडीए, सिडको वाचाही समावेश आहे. एमएमआरडीएमध्ये १९ तर सिङकोसोबत ६ करार झाले. मागील २ दिवसांत ८१ करार झाले असल्याचेही त्यानी स्पष्ट केले. कोकणासाठी ११ करार झाले असून त्यात ३ लाख ८१० कोटींची गुंतवणुकीचे करार झाले आहेत. आयटी, डेटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिफेन्स, डिजिटल इन्फ्रासारखे उद्योग असणार आहेत, असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






