राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया (Photo - X)
Devendra Fadnavis on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अजितदादांच्या विलीनीकरणाबाबतच्या भूमिकेचा उल्लेख केला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घडामोडींवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एका बाजूला शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, तर दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारखे नेते आहेत. विलीनीकरणाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनीच घ्यायचा आहे. मात्र, एनडीएमधील घटकपक्ष असल्याने या निर्णयाबाबत आमच्याशी सल्लामसलत करतील, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी अद्याप एनडीएमधील नेत्यांशी याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असं शरद पवार म्हणताना दिसले. या संवादानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पुन्हा तर्कवितर्क सुरू झाले.
सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसल्या असत्या, असं विधान केलं. अजितदादांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
आता या सर्व घडामोडींनंतर दोन्ही राष्ट्रवादी गट खरोखर एकत्र येणार का आणि त्यासाठी एनडीएची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?
Ans: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय शरद पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि संबंधित नेते घेतील. मात्र, एनडीएचा घटकपक्ष असल्याने या निर्णयाबाबत त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Ans: ब्रीच कँडी रुग्णालयातील भेटीदरम्यान 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचा उल्लेख शरद पवार यांनी केल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली.
Ans: अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असते, असं सुनील तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चा केली होती, असाही त्यांचा दावा होता.






