Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 

व्यापाऱ्यांच्या मते, पेठेतील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि अरुंद रस्ते ही मोठी समस्या ठरत आहे. दुसरीकडे मॉलमध्ये आरामदायी वातावरण, फूड कोर्ट आणि मनोरंजनाची सुविधा असल्याने खरेदी हा अनुभव बनला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 07:15 PM
पेठ संस्कृतीवर मॉल संस्कृतीचे सावट? बदलत्या खरेदीच्या सवयींमुळे पारंपरिक बाजारपेठांचे बदलते स्वरूप 
Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रभावामुळे पेठ संस्कृतीसमोर नवे आव्हान
  • सणासुदीला आजही ग्राहकांची पेठेत गर्दी 
  • पूर्वीच्या तुलनेत नियमित ग्राहकांची संख्या कमी
पुणे/गायत्री पवळे: पुण्याची ओळख असलेली लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, रविवारी पेठ, बुधवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ यांसारखी पारंपरिक बाजारपेठ आजही ग्राहकांनी गजबजलेली असते. मात्र गेल्या काही वर्षांत शहराच्या विविध भागांत उभे राहिलेले मोठे मॉल, ब्रँडेड शोरूम आणि ऑनलाइन खरेदीच्या वाढत्या प्रभावामुळे पेठ संस्कृतीसमोर (Navarashtra Special) नवे आव्हान निर्माण झाले आहे. तरीही “पेठ संपत नाही, ती बदलत आहे,” असे मत व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

व्यावसायिकांच्या मते, “सणासुदीला आजही ग्राहक पेठेतच येतात. येथे वस्तू पाहून, हाताळून आणि घासाघीस करून खरेदी करण्याचा अनुभव वेगळाच आहे. मात्र वर्षभरात सहज खरेदीसाठी अनेक ग्राहक मॉलकडे वळतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नियमित ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.”

“मॉलमध्ये वातानुकूलित सुविधा, पार्किंग आणि एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे तरुण कुटुंबे तिकडे जातात. पण किफायतशीर दर आणि विविध पर्यायांसाठी ग्राहक अजूनही पेठेत येतात. आम्हालाही डिजिटल पेमेंट, सोशल मीडिया आणि होम डिलिव्हरीसारखे पर्याय स्वीकारावे लागले आहेत.”

Mountain Climbing Day: पर्वतांना गवसणी घालणाऱ्या साहसाचा उत्सव; जाणून घ्या 1 ऑगस्टचा इतिहास, महत्त्व आणि प्रेरणादायी कथा

व्यापाऱ्यांच्या मते, पेठेतील वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि अरुंद रस्ते ही मोठी समस्या ठरत आहे. दुसरीकडे मॉलमध्ये आरामदायी वातावरण, फूड कोर्ट आणि मनोरंजनाची सुविधा असल्याने खरेदी हा अनुभव बनला आहे. त्यामुळे विशेषतः तरुण ग्राहकांचा कल मॉलकडे वाढत असल्याचे दिसत आहे.

तथापि, गणेशोत्सव, दिवाळी, गुढीपाडवा, लग्नसराई यांसारख्या हंगामात लक्ष्मी रस्ता आणि तुळशीबाग परिसरात आजही मोठी गर्दी होत असल्याचे व्यापारी सांगतात. पारंपरिक वस्तू, धार्मिक साहित्य, दागिने, कपडे आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी पेठांना अजूनही प्राधान्य दिले जाते. पुण्यातील पारंपरिक पेठांना कधीच मरण नाही असे अजूनही दिसून येत आहे.

Mountain Climbing Day: पर्वतांना गवसणी घालणाऱ्या साहसाचा उत्सव; जाणून घ्या 1 ऑगस्टचा इतिहास, महत्त्व आणि प्रेरणादायी कथा

मॉल संस्कृती आणि पेठ संस्कृती यांच्यात स्पर्धेपेक्षा सहअस्तित्वाचे चित्र अधिक दिसत आहे. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन पेठांमधील व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञान, ऑनलाइन उपस्थिती आणि उत्तम ग्राहकसेवा स्वीकारल्यास पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व कायम राहू शकते.

Web Title: Mall culture casting a shadow over pune peth culture traditional markets transforming to changing shopping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Mall
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
1

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
3

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
4

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.