Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एफआरपी’चे 3975 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर, तरीही 401 कोटी थकीत; साखर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर एकूण ४ हजार ४८९ कोटी १४ लाख रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी मोठा हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला असला तरी शेकडो कोटींची रक्कम अजूनही थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 01:40 PM
'एफआरपी'चे 3975 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर, तरीही 401 कोटी थकीत; साखर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह

'एफआरपी'चे 3975 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर, तरीही 401 कोटी थकीत; साखर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • ‘एफआरपी’चे 3975 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर
  • तरीही 401 कोटी थकीत
  • साखर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह
पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीपोटी (एफआरपी) देय असलेल्या रकमेपैकी तब्बल ३ हजार ९७५ कोटी ५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असले, तरी अजूनही सुमारे ४०१ कोटी ८५ लाख रुपये थकीत असल्याचे चित्र समोर आले आहे. साखर आयुक्तालयाच्या २८ फेब्रुवारीअखेरच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर एकूण ४ हजार ४८९ कोटी १४ लाख रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी मोठा हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला असला तरी शेकडो कोटींची रक्कम अजूनही थकीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे काही कारखान्यांनी देय एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देत सुमारे ३२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भरणा केल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, २०२५–२६ हंगामात जिल्ह्यातील १५ पैकी केवळ ६ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित कारखान्यांकडून मात्र अजूनही थकीत रकमेची टांगती तलवार कायम आहे. यामध्ये दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना विशेष चर्चेत आला आहे. श्री साईप्रिया शुगर्सकडून चालविल्या जाणाऱ्या या कारखान्यावर २६३ कोटी ६१ लाख रुपये एफआरपी देय आहे. मात्र त्यापैकी फक्त १३४ कोटी ६२ लाख रुपयेच शेतकऱ्यांना देण्यात आले, म्हणजेच केवळ ३५.५५ टक्के रक्कम अदा झाली आहे.

यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक – तब्बल १२८ कोटी ९९ लाख रुपयांची एफआरपी थकबाकी भीमा सहकारी साखर कारखान्याकडेच असल्याचे समोर आले आहे. पुढील पंधरवड्यात या थकबाकीपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात असली, तरी शेकडो कोटींच्या थकीत एफआरपीबाबत साखर आयुक्तालय नेमकी कोणती कठोर भूमिका घेणार, याकडे शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : प्रस्थापित नेत्यांची सत्ता धोक्यात; जिल्हा बँकांसाठी ‘सक्तीची निवृत्ती’चा नवा नियम

Web Title: Many sugar factories in pune district have outstanding frp amounts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • pune news
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
3

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात
4

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.