Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन

मराठी नाट्यव्यवस्थापन संघाने रंगयात्रा ॲपद्वारे होणाऱ्या सांस्कृतिक भवनांच्या तारखांचे ऑनलाईन आरक्षण बंद करण्याची मागणी करत महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 12:13 PM
नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन

नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध; नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • नाट्यगृहांच्या ऑनलाईन आरक्षणाला विरोध
  • नाट्य व्यवस्थापक संघाचे महापौरांना निवेदन
  • नाट्यसंस्थांना प्राधान्याची मागणी
पुणे : मराठी नाट्यव्यवस्थापन संघाने रंगयात्रा ॲपद्वारे होणाऱ्या सांस्कृतिक भवनांच्या तारखांचे ऑनलाईन आरक्षण बंद करण्याची मागणी करत महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन दिले आहे. ऑनलाईन आरक्षणामुळे राजकीय वर्चस्व असलेल्या सामाजिक संस्थांना सोय होऊन नाट्यसंस्थांना कमी तारखा मिळण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोगांऐवजी इतर कार्यक्रम वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अभिनेते उमेश कामत, नाट्यनिर्माते प्रसाद कांबळी, नाट्य व्यवस्थापक संघाचे सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, प्रवीण बर्वे, समीर हंपी, श्रीपाद पद्माकर तसेच नगरसेवक पृथ्वीराज सुतार उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाट्यसंस्थेशिवाय इतर खाजगी व्यावसायिक संस्था आर्थिक बळावर ऑनलाईन बुकिंग करून नाट्यव्यवसाय अडचणीत आणू शकतात. नाटकांच्या तिकिटांसाठी ऑनलाईन सुविधा उपयुक्त असली तरी नाट्यगृहांच्या आरक्षणासाठी ती गरजेची नसल्याचे संघाचे मत आहे.

मराठी नाट्यव्यवस्थापक संघाच्या मागण्या

  • मागील चौमाहीतील कार्यक्रमांच्या प्रमाणावर पुढील चौमाहीत तारखांचे वाटप करावे. ऑनलाईन आरक्षण बंद करून लेखी अर्जाची प्रक्रिया सुरू करावी.
  • बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, गणेश कला क्रीडा मंच, विठ्ठलराव तुपे नाट्यगृह येथे नाट्यसंस्थांना प्राधान्य द्यावे.
  • नाट्यगृहांची माहिती (स्टेजचा आकार, आसन क्षमता, भाडे, लोकेशन) ऑनलाईन उपलब्ध असावी; मात्र तारखांचे ऑनलाईन बुकिंग करू नये.
बालगंधर्व रंगमंदिर व्यावसायिक सभागृह होऊ नये

निवेदनात म्हटले आहे की, बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असून ते रंगमंदिरच राहावे. ऑनलाईन आरक्षणामुळे कोणत्या कार्यक्रमासाठी नाट्यगृह वापरले जाणार आहे, याची माहिती स्पष्ट होत नाही. लेखी अर्ज प्रक्रियेमुळे कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट होऊ शकतो.

“पुढील चौमाहीचे ऑनलाईन आरक्षण अद्याप सुरू झालेले नाही. प्राप्त झालेल्या लेखी अर्जांची पडताळणी करून त्यानुसार तारखा दिल्या जातील.” — राजेश कामठे, नाट्यगृह व्यवस्थापक, पुणे महानगरपालिका.

हे सुद्धा वाचा : पिंपरीत नवनियुक्त आयुक्तांचा ‘दणका’; अवैध बांधकामांना अभय देणाऱ्या दोन अभियंत्यांचे निलंबन

Web Title: Marathi theatre management association has made a big demand from mayor manjusha nagpure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.