Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांनो आता बिनधास्त फिरा! Pune Railway Station वर सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सध्या मार्च महिन्यात प्रायोगिक स्वरूपात एकाच प्रवेशद्वारातून प्रवाशांना आत सोडले जात असून,प्रत्येकाची काटेकोर तपासणी केली जात आहे. पुढील महिन्यात येण्या आणि जाण्यासाठी स्वतंत्र असे दोन गेट तयार करण्यात येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 25, 2026 | 11:08 AM
प्रवाशांनो आता बिनधास्त फिरा! Pune Railway Station वर सुरक्षेसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

पुणे रेल्वे स्टेशनवर दुहेरी गेट प्रणाली
सुरक्षा तपासणी होणार अधिक कडक
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

पुणे/चंद्रकांत कांबळे: पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, सध्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक प्रवाशाची आणि त्यांच्या सामानाची तपासणी करूनच आत प्रवेश दिला जात आहे. ही व्यवस्था सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून पुणे रेल्वे स्टेशनवर दुहेरी गेट प्रणाली राबविली जाणार आहे.एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या अंतर्गत रेल्वे प्रशासनाकडून ४ एक्स-रे बॅगेज स्कॅनर, ८ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) आणि १०० हँड-हेल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) मशीन मागवण्यात आली आहेत. ही सर्व यंत्रणा एप्रिलअखेरपर्यंत स्थानकावर बसवली जाणार आहे. यामुळे स्थानकातील सुरक्षा अधिक बळकट होणार असल्याचे आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी सुनील कुमार यादव यांनी सांगितले.

सध्या मार्च महिन्यात प्रायोगिक स्वरूपात एकाच प्रवेशद्वारातून प्रवाशांना आत सोडले जात असून,प्रत्येकाची काटेकोर तपासणी केली जात आहे. पुढील महिन्यात येण्या आणि जाण्यासाठी स्वतंत्र असे दोन गेट तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘आमरेला गेट’ हे प्रवेशासाठी,तर शेजारील गेट निर्गमनासाठी वापरले जाणार आहे.यामुळे प्रवाशांना येणे-जाणे अधिक सुलभ होणार आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर विभागीय रेल्वे कार्यालय आणि मेट्रो स्थानकाकडून येणाऱ्या प्रवाशांचीही याच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. या नवीन यंत्रणेमुळे सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Pune Railway Station Security Alert: बापरे…!पुणे रेल्वे स्थानकांवर छुप्या कॅमेऱ्यांतून हेरगिरी? पुणे विभागात हाय अलर्ट

एप्रिल महिन्यात ही यंत्रणा बसवण्यात येणार 

– एक्स-रे बॅगेज स्कॅनर ०४

– डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर (डीएफएमडी) ०८

– हँड-हेल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) १००

सुरक्षा यंत्रणांचे महत्त्व

रेल्वे स्थानकांवर एक्स-रे बॅगेज स्कॅनरद्वारे बॅगमधील वस्तू उघडल्याशिवाय तपासता येतात, तर डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर प्रवाशांच्या अंगावरील धातूची वस्तू ओळखतात. हँड-हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे संशयास्पद व्यक्तींची सखोल तपासणी करता येते. त्यामुळे शस्त्रे, स्फोटके किंवा अन्य घातक वस्तू स्थानकात येण्यापासून रोखता येते.

Railway प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे स्थानकावर सुरू झाली ‘ही’ जबरदस्त सुविधा, काय असणार खास?

रेल्वे विभाग प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर आहे. पुणे विभागात एप्रिलअखेरपर्यंत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात येणार असून प्रत्येक प्रवाशाची तपासणी करूनच प्रवेश दिला जाईल. तसेच येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली जात आहे.

— हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग पुणे

Web Title: Metal detector door frames will installed at pune railway station to ensure safety of passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Railway Station News
  • safety tips

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.