Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार! आमदार शंकर जगताप आक्रमक

बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 01:15 PM
फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार! आमदार शंकर जगताप आक्रमक

फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार! आमदार शंकर जगताप आक्रमक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे बनावट व विषारी हातभट्टी दारू सेवनामुळे तब्बल १९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात उमटणार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी या संवेदनशील प्रकरणावर लक्षवेधी सूचना (लक्षवेधी क्रमांक १) विधानसभेत दाखल केली आहे.

 

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून मुंबई येथे सुरु होत आहे. या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून फुगेवाडी विषारी दारूकांडाकडे सरकारचे लक्ष वेधून घेत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि या जीवघेण्या अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकण्याची आक्रमक मागणी आमदार जगताप करणार आहेत. गेल्या २८ मे ते १ जून २०२६ या कालावधीत फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात विषारी गावठी दारू पिऊन १९ जणांचा वेदनादायी अंत झाला होता. काळा गूळ आणि उसाच्या मळीपासून तयार केल्या जाणाऱ्या गावठी दारूची नशा व तीव्रता वाढवण्यासाठी माफियांकडून धोकादायक नवसागर, युरिया, ऑक्सिटोसिन रसायन, आणि अत्यंत प्राणघातक मिथेनॉल यांसारख्या रसायनांची बेकायदेशीरपणे भेसळ करून हे मृत्यूचे तांडव घडवून आणले गेले.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, दारूकांड झाल्यानंतरही तसेच शहरात पोलिसांची कारवाई सुरू असताना दारू माफियांनी दुर्गम भागात आपल्या हातभट्ट्या हलवून शहरात विषारी दारू पुरवठा सुरूच ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दारू माफियांनी फुगेवाडी, दापोडी आणि हडपसरमध्ये मृत्यूचे जे तांडव घडवले, ते पाहून मन सुन्न झाले आहे. रसायनांची जीवघेणी भेसळ करून निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांचीही गय केली जाणार नाही. या पीडित कुटुंबांचे अश्रू वाया जाऊ देणार नाही. अधिवेशनात या गंभीर विषयावर पहिली ‘लक्षवेधी’ मांडून गुन्हेगारांना शिक्षा आणि पीडितांचे पुनर्वसन हीच माझी प्राथमिकता आहे.” असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

या प्रश्नांवर आवाज उठविणार!

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवणे. आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीविषयक तक्रारींसाठी ‘फास्टट्रॅक लेबर कोर्ट’ सुरू करणे या मागणीसह औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना रोखण्यासाठी सर्व कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ बंधनकारक करणे. शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावे. पिंपरी-चिंचवड मनपाचा चुकांनी भरलेला प्रारूप विकास आराखडा रद्द करावा आणि मनपा प्रशासनातील ४,७७६ रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी मंजुरी द्यावी. याशिवाय, प्राधिकरणाच्या आरक्षित जागांवर दीर्घकाळापासून राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालकीचे सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड मिळावे. ‘महाज्योती’ संस्थेमार्फत वंचित विद्यार्थ्यांची तांत्रिक कारणांमुळे अडकलेली सुमारे १२६ कोटी रुपयांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने मंजूर करावी, औंध जिल्हा रुग्णालयातील बंद असलेली एमआरआय सुविधा सुरू करावी आणि महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी ‘कॅशलेस’ सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागण्यांवर आमदार जगताप सभागृहात आवाज उठवणार आहेत.

आगामी काळात “अवैध दारूचा साठा, वाहतूक आणि विक्रीची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्यात तातडीने माहितीची देवाणघेवाण करून संयुक्त कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी विशेष पथकाची सक्षम यंत्रणा उभारून मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन दिले पाहिजे. ही मागणी लक्षवेधीद्वारे सभागृहासमोर ठेवली आहे. — आमदार शंकर जगताप (चिंचवड विधानसभा)

Web Title: Mla shankar jagtap is set to raise the issue of the phugewadi toxic liquor incident during the legislative session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • BJP city president Shankar Jagtap
  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी दिलासा! पीएमआरडीए अन् महारेलचा ऐतिहासिक करार; रेल्वेफाटक मुक्तीचा मार्ग मोकळा
1

पुणेकरांसाठी दिलासा! पीएमआरडीए अन् महारेलचा ऐतिहासिक करार; रेल्वेफाटक मुक्तीचा मार्ग मोकळा

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल
3

लोणावळ्यातील बंगल्यात सुरु असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ पार्टीवर छापा; तब्बल 18 जणांवर गुन्हा दाखल

व्यावसायिकांचे धाबे दणाणले! सिंधुदुर्गमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरुच; लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

व्यावसायिकांचे धाबे दणाणले! सिंधुदुर्गमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई सुरुच; लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.