Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बेठक संपन्न; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

सिंचन भवन येथे आमदार शिवतारे यांच्या उपस्थितीत पुरंदर उपसा योजना, कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्प व अन्य विषयांवर बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 11, 2025 | 06:55 PM
विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बेठक संपन्न; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे बेठक संपन्न; अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४ टीएमसी पाणी सिंचनासाठी उचलण्यास परवानगी आहे. परंतु जलसंपदा विभाग योजना कार्यान्वित झाल्यापासून २ टीएमसी पेक्षा अधिक पाणी उचलू शकेलला नाही, ही बाब लक्षात घेऊन तांत्रिक दोष आणि जास्तीत जास्त जलवाहिन्याचे जाळे निर्माण करून पूर्ण क्षमतेने उपसा सिंचन योजना चालवावी. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून आणू, असे प्रतिपादन आमदार विजय शिवतारे यांनी केले आहे. सिंचन भवन येथे आमदार शिवतारे यांच्या उपस्थितीत पुरंदर उपसा योजना, कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्प व अन्य विषयांवर बैठक पार पडली. यावेळी त्यांनी उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

या बैठकीला शिवतारे यांच्यासह मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, अधिक्षक अभियंता जैस्वाल, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, राजेंद्र दुबल यांच्यासह शिवसेनेचे पुरंदर तालुकाप्रमुख हरीभाऊ लोळे, गणेशराव मुळीक, विक्रांत पवार, आड. नितीन कुंजीर, सामाजिक कार्यकर्ते तात्या मगर, अविनाश बडदे, विशाल लवांडे, दिपक काळे, उमेश काळे, सागर यादव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

नदीजोड प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण

आमदार शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या कऱ्हा नीरा नदीजोड प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यात शिवतारे यांनी काही दुरुस्त्या प्रस्तावित केल्या. याशिवाय पुरंदर उपसा योजनेचे पंप कचरा, जलपर्णी व प्लास्टिक यामुळे मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येत असलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहून घ्यावे, अशा सूचना शिवतारे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणारी यंत्रणा अत्यंत दर्जाहीन आणि संथ असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

यंदा अतिरिक्त ३० कोटींचा निधी मिळणार

दरम्यान गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित मान्यता प्रस्ताव आणि निधी उपलब्धतेबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही शिवतारे यांनी यावेळी सुचित केले. पुरंदर उपसा योजनेचे तलाव जोडण्यासाठी यंदा अतिरिक्त ३० कोटींचा निधी मिळणार असून पूर्व भागातील राजुरी, रिसे, पिसे, नायगाव आणि पांडेश्वर या गावांनाही पुरंदर उपसाचा नियमित लाभ मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, असे शिवतारे यांनी सांगितले.

Web Title: Mla vijay shivtare has given important instructions to the officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
4

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.