Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंजवणीच्या पाण्यासाठी मी किडनी घालवली, पण…; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

आमदार शिवतारे मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी रुग्णालयातून व्हिडीओच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील जनतेशी संवाद साधला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 05:37 PM
गुंजवणीच्या पाण्यासाठी किडनी मी घालवली, पण...; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

गुंजवणीच्या पाण्यासाठी किडनी मी घालवली, पण...; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदरच्या जनतेला गुंजवणी धरणातील हक्काचे पाणी मिळावे. यासाठी सासवडच्या पालखी तळावर १३ दिवस उपोषण केले. त्यानंतरच्या काळात शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतानाही पुरंदरच्या विकासाची गंगा थांबवू दिली नाही. त्या उपोषणानंतर माझी किडनी खराब झाली. मात्र, देवाने माझ्या मुलीच्या रूपाने पुन्हा एकदा संधी दिली. ज्या कामासाठी उपोषण केल्याने किडनी खराब झाली, ते पाण्याचे काम देवाने माझ्याकडूनच करून घेतल्याचे समाधान वाटत आहे. अशा शब्दात पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

आमदार विजय शिवतारे यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. त्यांची कन्या ममता शिवतारे-लांडे यांनी त्यांना किडनी दान करून नवीन आयुष्य दिले आहे. सध्या आमदार शिवतारे मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी रुग्णालयातून व्हिडीओच्या माध्यमातून पुरंदर हवेलीतील जनतेशी संवाद साधला आहे.

पालखी तळावर २०१२ मध्ये उपोषण केले होते. तेव्हापासून मला किडनीचा त्रास जाणवत होता. २०२० पासून रक्त शुद्धीकरण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बायपास झाली. दिवसाआड डायलिसीस सुरू आहे. तब्बल सहा तास प्रक्रिया सुरु असते. मागील अधिवेशन दरम्यान ऑगस्टपासून त्रास होत होता. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तातडीने करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याकडे मी दुर्लक्ष करून तालुक्याची विकासकामे कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष देत होतो.

तिच्यामुळे मला आयुष्य मिळाले

माझी कन्या ममता शिवतारे लांडे यांनी किडनी देणार, असे सांगितले होते. त्यानंतर ३० मार्च रोजी किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सलग चार दिवस आयसोलेशनमध्ये होतो. प्रचंड औषधे असल्याने खूप त्रास झाला. अद्यापही झोपही येत नाही. सर्व औषध उपचार सुरू असून धोका पूर्णपणे टळला आहे. बाप आणि लेकीचे आयुष्य काय असते, हे ममताने दाखवून दिले. तिच्यामुळे मला आयुष्य मिळाले आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : मिळकतकरावरील दंड एक टक्क करा, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांचा स्थायी समितीला प्रस्ताव; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

पुरंदरची मुंबई करायची आहे

माझ्या कन्येने देवाच्या रुपात येवून मला जीवनदान दिले. पुढील काळात आमदार म्हणून नाही तर पुरंदर हवेलीचा कुटुंब प्रमुख म्हणूनच काम करायचे आहे. आता पुरंदरला मुंबई करायची असून उद्याची नवी मुंबई पुरंदरलाच पहायची आहे. नवनवीन उद्योग, नोकरी निर्माण करण्याचे धोरण आहे. मला मामतामुळे मोठे आयुष्य मिळाले आहे. पुढील काळात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, आयटी पार्क, यातून हजारो हाताना काम मिळणार आहे. नवी मुंबई पुरंदरलाच पाहायला मिळणार आहे, असा विश्वास आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mla vijay shivtare is undergoing treatment at breach candy hospital in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • Saswad News
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
1

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार
2

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी
3

Tuljabhavani Temple : ‘आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड?’ चिनी CCTV प्रकरणावर कैलास पाटील आक्रमक; SIT चौकशीची मागणी

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?
4

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.