Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कथित बेकायदा उत्खननाची तातडीने चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मराठा महासंघाने केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 06:21 PM
वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • भूस्खलनाला बेकायदा उत्खनन जबाबदार?
  • महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मराठा महासंघाची मागणी
  • अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
वाई प्रतिनिधी : वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या कथित बेकायदा उत्खननाच्या विरोधात राष्ट्रीय मराठा महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

राष्ट्रीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. निवेदनात वाई तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शेती, घरे, रस्ते आणि पुलांना गंभीर धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप

संघटनेच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी कारवाई किंवा महसूल वसुली करण्यात आली नसल्याने या प्रकाराला अधिकाऱ्यांचे मूक समर्थन मिळाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

मराठा महासंघाने या प्रकरणी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भूस्खलनग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून बाधित नागरिकांना आर्थिक मदत व दिलासा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने भविष्यात अशा प्रकारचे बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. या सर्व मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय मराठा महासंघाने दिला आहे.

राष्ट्रीय मराठा महासंघाच्या प्रमुख मागण्या

वाईच्या पश्चिम भागातील बेकायदा उत्खननाची तातडीने चौकशी करावी.

संबंधित महसूल अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी.

दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

भूस्खलनग्रस्त भागांचे पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत द्यावी.

भविष्यात बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात.

वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी

Web Title: Wai illegal mining inquiry demand maratha mahasangh protest warning news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
1

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
2

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
3

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
4

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.