Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट

बारामतीत झालेला पेट्रोल पंपावर कोयत्याने हल्ला व शेरेवाडी परिसरातील घटनांच्या यापार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेतली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2026 | 02:59 PM
बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट

बारामतीत कोयता गँगचा हैदोस, खासदार सुप्रिया सुळे ॲक्शन मोडवर; SP संदीपसिंह गिल यांची घेतली भेट

Follow Us
Follow Us:

पुणे : बारामतीत झालेला पेट्रोल पंपावर कोयत्याने हल्ला व शेरेवाडी परिसरातील घटनांच्या यापार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेतली. बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह संपूर्ण पुणे ग्रामीण भागात पोलिस पेट्रोलिंग वाढविण्यासह संवेदनशील ठिकाणी चेकिंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे आणि आवश्यकतेनुसार पोलिसांचे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी त्यांनी केली.

 

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, “केवळ बारामतीच नव्हे, तर बारामती लोकसभा मतदारसंघातील सुमारे ८० टक्के भाग ग्रामीण आहे. मोठ्या स्वरूपाचे गुन्हे वाढल्याचे दिसत आहे. मात्र, एकूण गुन्हेगारी वाढली आहे, असे म्हणता येणार नाही. पोलिस अधीक्षकांचे काम चांगले असून, मदत मागितल्यास ते सहकार्य करतात.” अलीकडील काही गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा घटनांकडे पोलिस यंत्रणेने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीतील पेट्रोल पंपावर कोयत्याने झालेला हल्ला तसेच सुपे परिसरातील घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सुळे यांनी नमूद केले.

डीपी, पोलच्या चोऱ्यांबाबतही चिंता

बारामती लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यात वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी आणि पोलच्या चोऱ्या वाढल्याचेही सुळे यांनी सांगितले. गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि अशा प्रकारच्या चोऱ्या या दोन वेगळ्या बाबी असून, त्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “डीपी किंवा पोलच्या चोऱ्या का वाढत आहेत, याचा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा. अर्थव्यवस्था मंदावणे, रोजगाराच्या संधी कमी होणे आणि अशा चोऱ्यांमध्ये काही संबंध आहे का, याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

पोलिस यंत्रणेला सहकार्याची भूमिका

ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिस यंत्रणेला आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे सुळे यांनी सांगितले. अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, जनजागृती कार्यक्रम घेणे, संवेदनशील भागात चेकिंग वाढविणे तसेच आवश्यकतेनुसार पोलिसांचे मनुष्यबळ वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “पोलिस यंत्रणेला आमच्याकडून काही मदत करता येत असेल, तर ती करण्याची आमची तयारी आहे. काही ठिकाणी पोलिस वाढविण्याची किंवा चेकिंग वाढविण्याची आवश्यकता असल्यास त्याबाबत निर्णय घ्यावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे,” असे सुळे यांनी सांगितले.

Web Title: Mp supriya sule has met pune rural superintendent of police sandeep singh gill nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MP Supriya Sule
  • Pune Police

संबंधित बातम्या

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई
1

घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती
2

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
3

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
4

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.