Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सासवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या ऑलमध्ये एक मेलेले कुत्रे अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आणि त्याभोवती हजारो आळ्या आणि किडे जमल्याचे देखील दिसून आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2026 | 01:49 PM
पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

Follow Us
Follow Us:

सासवड : सासवड नगरपरिषदेची सध्याची अवस्था खूपच दयनीय झाली असून, प्रशासनाचा सावळा गोंधळ पावलोपावली दिसून येत आहे. प्रशासनाची कामे करूनही पैसे मिळत नसल्याने ठेकेदार जाम वैतागले आहेत. याचाच अनुभव आला आणि संपूर्ण सासवड शहरात एकच खळबळ उडाली. पाणी पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्याचा सुमारे पाच महिन्याचा पगार न मिळाल्याने त्याने थेट पाणीच बंद करून मला त्रास दिल्यास आत्महत्या करणार असा इशारा दिला. त्यावेळी त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला. व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण शहरात आणि तालुक्यात खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच ठेकेदाराने संबंधित कर्मचाऱ्याला 77 हजार रुपये पगार दिला.

सासवड नगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगार प्रकाश यादव यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सुमारे पाच महिन्यांचा पगारच दिला नाही. यामुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्याने पाणी पुरवठा विभागातील विद्युत पंप ठेवलेल्या खोलीत जाऊन, मला पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे मी आजपासून पाणी बंद करत आहे, असे म्हणून सर्व पंप बंद केले. तसेच मला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास याच ठिकाणी छताला गळफास घेऊन आत्महत्या करणार असा इशारा दिला. विशेष म्हणजे यावेळी त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. सासवड नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेत संबंधित ठेकेदाराला देखील चांगलेच सुनावले असावे असा अंदाज आहे. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्याची तातडीने भेट घेऊन त्याची समजूत काढली. आणि त्याचा पाच महिन्यांचा सुमारे ७७ हजार रुपये पगार हातात दिला. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवून मला ठेकेदाराने पाच महिन्यांचे पैसे दिले असून, आता माझी काहीही तक्रार नाही, असे सांगितले. आणि तसा व्हिडिओ पुन्हा समाज माध्यमावर प्रसारित केला.

आत्महत्येच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे

अर्थात संबंधित कर्मचाऱ्याला स्वतःच केलेल्या कामाचा पगार मिळवण्यासाठी संपूर्ण सासवड शहराचा पाणी पुरवठा काही वेळ का होईना पण बंद करावा लागला, एवढेच नाही तर मला त्रास दिल्यास थेट आत्महत्या करण्याचा इशारा द्यावा लागला. त्यानंतरच प्रशासन जागे झाले आहे. त्यामुळे अगोदरच चर्चेत असलेल्या प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाचा संपूर्ण तालुक्याला चांगलाच अनुभव आला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सासवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या ऑलमध्ये एक मेलेले कुत्रे अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आणि त्याभोवती हजारो आळ्या आणि किडे जमल्याचे देखील दिसून आले. याची दखल स्वतः आमदार विजय शिवतारे यांनी घेतल्यानंतर काही वेळातच प्रशासन भानावर आले आणि त्यांनी तेथील स्वच्छता करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून एक गोष्ट प्राधान्याने समोर आली आणि ती म्हणजे प्रशासनाला जागेवर आणायचे असेल तर काही तरी वेगळ्या मार्गाने जावे लागते. परंतु हे किती दिवस चालणार ? असा प्रश्न आता सासवडकर नागरिक उपस्थित करीत आहेत.

Hingoli Earthquake : गडगडाट अन् जमीन हादरली ! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

Web Title: Municipal employee threatens suicide over non payment of salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • pune news
  • Saswad News

संबंधित बातम्या

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित
1

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
2

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
3

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
4

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.