Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून सातारा रोडवरील वाहतूक कोंडी टाळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 12:41 PM
स्वारगेट ते कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा; रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गावर सध्या केवळ दोन ते तीन बस थांबे कार्यरत असून, उर्वरित बहुतांश थांबे प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्गात मोठे बदल करण्यात आले असून, त्यामुळे सातारा रस्त्यावर वाहतुकीचा गोंधळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

 

स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रोच्या कामामुळे सातारा रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत असून, पीएमपी बससेवेच्या बदललेल्या मार्गरचनेमुळे भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून वाहतुकीचा गोंधळ टाळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

पुणे मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून स्वारगेट-कात्रज मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी काही ठिकाणी बीआरटी मार्ग आणि स्थानके हटविण्यात आली आहेत. परिणामी पीएमपी बससेवेमध्ये बदल करण्यात आले असून, काही भागांत बस बीआरटी मार्गातून तर काही भागांत सामान्य रस्त्यावरून चालविण्यात येत आहेत.

पंचमी हॉटेल, भापकर पंप, अरण्येश्वर कॉर्नर, पद्मावती, के. के. मार्केट, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, कात्रज सर्पोद्यान आणि मोरे बाग परिसरात बीआरटी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, यातील भारती विद्यापीठ ते कात्रज आणि पंचमी हीच स्थानके सुरू आहेत. त्यामुळे या भागांत बस सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्यावरून धावत आहेत.

प्रत्यक्षात नातूबाग बसथांबा हटविण्यात आला असून, बालाजीनगर, विश्वेश्वर, पद्मावती आणि अरण्येश्वर येथील बीआरटी थांबे हिरवे पडदे लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भापकर पेट्रोल पंप ते बालाजीनगर या दरम्यान बीआरटी मार्ग सलग स्वरूपात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. या ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला पदपथालगत पीएमपीचे तात्पुरते बसथांबे उभारण्यात आले आहेत.

पीएमपी बस कधी बीआरटी मार्गातून तर कधी सामान्य वाहतुकीत येत असल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी बस मुख्य रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

“सातारा रस्ता हा शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. मेट्रोच्या कामामुळे आधीच वाहतुकीवर ताण आहे. अशा परिस्थितीत पीएमपीची वाहतूक योग्य नियोजनाशिवाय बदलल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. प्रशासनाने वाहतूक पोलिस, पीएमपी आणि मेट्रो प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये मध्यरात्री धावत्या ट्रॅव्हल्सला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 35 प्रवासी बचावले

Web Title: Ncp leader rohan suravase patil has made a big demand from the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • pune news
  • Traffic News

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस
1

MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम; एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
2

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
3

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
4

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.