Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे बिनविरोध

वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.भाजपच्या उमेदवारने माघार घेतल्याने बिनविरोध निवडणूक झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2026 | 05:32 PM
NCP Sunil Ganesh Dhore unanimously elected Deputy Chairperson of the Vadgaon maval Nagar Panchayat

NCP Sunil Ganesh Dhore unanimously elected Deputy Chairperson of the Vadgaon maval Nagar Panchayat

Follow Us
Close
Follow Us:

Vadgaon Maval Deputy Mayor : वडगाव मावळ : सतीश गाडे : वडगाव नगरपंचायतीच्या (Maval News) उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Politics) सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरीनाथ राजाराम ढोरे व भारतीय जनता पक्षाचे संदीप भास्कर म्हाळसकर यांचीही बिनविरोध निवड झाली. ही निवड प्रक्रिया नगराध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

आज (दि, 12 जानेवारी) सकाळी ११ वाजता उपनगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज सादर करण्यात आले होते. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील ढोरे तर भाजपकडून अर्चना म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र छाननीनंतर अर्ज माघारीच्या मुदतीत भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने सुनील ढोरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

हे देखील वाचा : निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

स्वीकृत नगरसेवकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरीनाथ ढोरे व भाजपकडून संदीप म्हाळसकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या. दुपारी १.१५ वाजता नगराध्यक्ष अबोली ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्या. निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे तसेच स्वीकृत नगरसेवकांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, विकासकामांना प्राधान्य देणे व पारदर्शक कारभार राबवणे, असा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ९ जागा, भाजप महायुतीला ६ जागा, तर २ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे यांची निवड झालेली आहे.

हे देखील वाचा : “हिंमत असल्यास हात-पाय तोडून…”; के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

यावेळी भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे गणेशअप्पा ढोरे सुधाकर शेळके, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अशोक बाफना गटनेते अजय बाळासाहेब म्हाळसकर, पक्षनेत्या माया चव्हाण, तसेच नगरसेवक अनंता कुडे, विशाल वहिले, गणेश म्हाळसकर, पूनम भोसले, सुनीता ढोरे, वैशाली सोनवणे, राणी म्हाळसकर, रोहित घडवले, अजय भवार आदी उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रकाश व्यवस्था तसेच मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येईल. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासात्मक निर्णय घेतले जातील. स्वीकृत नगरसेवकांनीही पारदर्शक प्रशासन व लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात वडगाव शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधक यांच्यात समन्वय ठेवून काम केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

राजकीयदृष्ट्या पाहता वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने उपनगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Ncp sunil ganesh dhore unanimously elected deputy chairperson of the vadgaon maval nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्…
1

वडगाव नगरपंचायतीचा 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; पाणीपुरवठा, रस्ते, अन्…

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल
2

मावळमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची मोठी फसवणूक; बँकेकडे गहाण ठेवलेल्या सदनिका विक्री, बिल्डर्सवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.