के. अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात सुरू आहे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी
भाजपे नेते अण्णामलई यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नसल्याचे केलेले वक्तव्य
K-Annamalai Vs Raj Thackeray: राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. प्रचार संपायला 2 दिवस बाकी आहेत. त्या आधी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अनेक नवीन युती, आघाडी पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी भाजपचे नेते के. अण्णामलई यांच्या बॉम्बे महाराष्ट्राचे शहर नाही यावरून टीका केली होती. आता त्याला के. अण्णामलई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
के. अण्णामलई यांचे विधान काय?
तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते की, ” बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या महापालिकेचे बजेटच ७५ हजार कोटी इतके आहे. चेन्नई आणि बंगळुरूचे बजेच १९ हजार कोटींचे आहे. त्यामुळए या शहरांचे नियोजन करण्यासाठी चांगल्या सरकारची गरज आहे.” असे म्हटले.
राज ठाकरेंची टीका काय?
के. अण्णामलाई यांच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेतून टीका केली आहे. एक रसमलाई तामिळनाडूमधून मुंबई आली आहे. तु इथे येण्याचा काय संबंध? हटाओ लुंगी बजाओ पुंगी, अशा प्रकारची टीका केली होती. के. अण्णामलाई यांना त्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना जीवे मारण्याची किंवा हातपाय तोडण्याची धमकी येत असल्याचे समोर येत आहे. आता यावर के. अण्णामलई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
के. अण्णामलई यांचे प्रत्युत्तर काय?
चेन्नईमध्ये के. अण्णामलई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला मारण्याच्या, हात पाय तोडण्याच्या धमक्या येत आहेत. दरम्यान मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी मुंबईत नक्की जाईन. तुमच्यात हिंमत असेल तर माझे हातपाय तोडून दाखवा. मला धमकी देणारे हे नक्की कोण आहेत? अशा धमकीसमोर मी झुकणार नाही.
संजय राऊतांची टीका
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी इतर राज्यातील स्टार प्रचारकांना राज्यात पाचारण केलं आहे. तमिळनाडूमधील नेते के. अण्णामलाई मुंबईतील प्रभाक क्र. ४७ येथे प्रचार करण्यासाठी आले होते. प्रचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.






