Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंत राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवायांना सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागात एफडीएने धाडसत्र सुरु असतानाच आता पुन्हा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही भेसळखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 09, 2026 | 09:00 PM
तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडक कारवाई, कोल्हापूर आणि पुण्यात लाखो रुपयांचा औषधसाठा जप्त

Follow Us
Follow Us:
  • एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची आणखी एक धडक कारवाई
  • कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात 24 लाख 81 हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त
  • बेकायदेशीर काम करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहील, आयुक्त तुकाराम मुंढेचा इशारा
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंत राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक कारवायांना सुरुवात केली आहे. राज्यातील विविध भागात एफडीएने धाडसत्र सुरु असतानाच आता पुन्हा कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही भेसळखोरांविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात ८ जून २०२६ रोजी दोन कारवाया करत एकूण 24 लाख 81 हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

कोल्हापूरमध्ये औषधसाठा जप्त

कोल्हापूर येथील रविवार पेठ परिसरातील मे. मेडटॅब्स फार्मा प्रा. लि. येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधे, विशेषतः प्रतिजैविक (अँटिबायोटिक) इंजेक्शन्सचा साठा आढळून आला. सदर औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन प्रकरणी औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित २९ प्रकारच्या औषधांचा ₹13.62 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त

पुण्यात औषध कंपनीच्या गोदामावर कारवाई

दुसऱ्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील वडकी येथे असलेल्या मे. सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ‘रेक्टीन प्लस टॅब्लेट’ या शेडयूल एच अंतर्गत येणाऱ्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर औषधाच्या वापराबाबत जाहिरात करण्यात आल्याचे आढळून आले. अशा प्रकारची जाहिरात औषधे व सौंदर्यप्रसाधने नियम, १९४५ मधील तरतुदींशी विसंगत असल्याने संबंधित औषधाचा सुमारे ₹11.19 लाख किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. औषध उत्पादक व विक्रेत्यांनी सर्व कायदे व नियमांचे काटेकोर पालन करावे. राज्यात औषध उत्पादन, साठवण, वितरण आणि विक्री क्षेत्रातील कोणतीही बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांविरुद्ध कठोर व सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

औषधे केवळ अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. संशयास्पद औषध विक्री, बेकायदेशीर साठा किंवा अनियमिततेची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी असे आवाहन केले आहे.

आदिवासी मुलांसाठी ‘मानवतेचा हात, सर्वांचा साथ’ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले…

Web Title: Ndf commissioner tukaram mundhe raid and seized medicines at kolahpur and pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Tukaram Munde

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.