Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे मार्गालगतच्या हद्दीत बांधकामासाठी NOC बंधनकारक; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, नियोजन प्राधिकरणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेल्वेचे ना-हरकत प्रमाणपत्र पडताळल्याशिवाय 30 मीटरच्या परिसरातील कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये, असे निर्देश मध्य रेल्वेने दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2026 | 11:49 AM
रेल्वे मार्गालगतच्या हद्दीत बांधकामासाठी NOC बंधनकारक; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

रेल्वे मार्गालगतच्या हद्दीत बांधकामासाठी NOC बंधनकारक; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

Follow Us
Follow Us:

पुणे : रेल्वेच्या जमिनीच्या सीमेपासून 30 मीटरच्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घेणे अनिवार्य असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. एनओसीशिवाय उभारण्यात आलेली बांधकामे अनधिकृत मानली जातील. तसेच अशा बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून, त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाईही दिली जाणार नसल्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार तसेच ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स’ (यूडीसीपीआर) मधील तरतुदींप्रमाणे रेल्वेच्या जमिनीपासून 30 मीटरच्या परिसरातील कोणत्याही बांधकामासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मात्र, अलीकडील पाहणीत प्रस्तावित रेल्वे मार्गांच्या परिसरात आवश्यक एनओसी न घेता अनेक इमारती आणि इतर बांधकामे उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

India UK FTA : भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करार आजपासून लागू; व्हिस्कीपासून ते लक्झरी कारपर्यंत अनेक ब्रिटिश वस्तू होणार स्वस्त

जमीन अधिग्रहण प्रक्रियेदरम्यान अशा अनधिकृत बांधकामांमुळे रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, जमीन अधिग्रहणास विलंब, नुकसानभरपाईसंदर्भातील वाद आणि प्रकल्पांचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे.

रेल्वे प्रशासनाने NOC केली बंधनकारक

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्प मार्गांचे ड्रोन व व्हिडिओ सर्वेक्षण सुरू केले आहे. या माध्यमातून बांधकामे होण्यापूर्वीची जमिनीची स्थिती नोंदवून ठेवली जाणार असून, भविष्यातील वाद टाळण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना ३० मीटरच्या हद्दीत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी सक्षम रेल्वे प्राधिकरणाकडून एनओसी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच एनओसीशिवाय उभारलेल्या बांधकामांमुळे होणारे आर्थिक नुकसान, पाडकाम किंवा इतर परिणामांसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सूचना

ग्रामपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका, नियोजन प्राधिकरणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेल्वेचे ना-हरकत प्रमाणपत्र पडताळल्याशिवाय ३० मीटरच्या परिसरातील कोणत्याही बांधकामास परवानगी देऊ नये, असे निर्देश मध्य रेल्वेने दिले आहेत. रेल्वेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

US Iran War : युद्ध चिघळले ! अमेरिकेच्या नव्या कारवाईनंतर इराण आक्रमक; खाडी देशांमध्ये तणाव शिगेला

Web Title: Noc mandatory for construction within the area adjacent to the railway line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Construction Work
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
1

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा
2

Railway Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा नाही! रेल्वेमध्ये ‘या’ जागांवर भरतीची मोठी संधी; आजच अर्ज करा

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
3

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.