Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 16, 2026 | 06:04 PM
कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

Follow Us
Follow Us:
  • कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट
  • मजुरांचा मोठा तुटवडा
  • बाजारभावाचाही फटका
पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती उष्णता, मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरी दर आणि बाजारपेठेत मिळणारा कवडीमोल भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली आले आहेत. यासोबतच अवकाळी पावसाचे संकटही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. तालुक्यात सर्वत्र कांदा काढणीची लगबग सुरू असली तरी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

 

वाढत्या तापमानामुळे स्थानिक मजूर शेतात काम करण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना बाहेरील जिल्ह्यांतून मजूर आणावे लागत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना दारोदार फिरावे लागत असून, इतर तालुक्यांमध्येही जावे लागत आहे. मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा वेळेत काढला गेला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी चिंता कांदा उत्पादक शेतकरी माजी सरपंच राजूशेठ ढोबळे व अनिल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी धास्तावले

दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीला वेग दिला आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत.

बाजारभावाअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

बाजारपेठेत कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मजुरीचे पैसे कसे द्यायचे आणि काढणीचा खर्च कसा भागवायचा, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मागील हंगामातही अपेक्षित भाव न मिळाल्याने काही शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची वेळ आली होती. सध्या शेतकरी भविष्यात बाजारभाव सुधारेल या आशेने कांदा काढणी करून साठवणुकीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मजूर टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच गडद होत असल्याचे चित्र आहे.

हे सुद्धा वाचा : बोगस कॉल सेंटरच्या रॅकेटमध्ये IPS दत्ता कराळेंसह दोन पोलीस अधिक्षकांचा सहभाग; काँग्रेसचा गंभीर आरोप

Web Title: Onion farmers in ambegaon taluka are in crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Ambegaon
  • Farmers
  • onion price

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती
2

आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा! स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
3

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला
4

Bail Pola Festival: चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.