Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओतूर परिसरात अवकाळीचे सावट; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ

जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये आज अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2026 | 04:38 PM
ओतूर परिसरात अवकाळीचे सावट; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ

ओतूर परिसरात अवकाळीचे सावट; कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ

Follow Us
Follow Us:

ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये आज अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. उन्हाळ कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असतानाच निसर्गाने रंग बदलल्याने, शेतात साठवून ठेवलेला ‘लाल सोन्याचा’ ढीग (आरणी) प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे.

 

​गेल्या काही दिवसांपासून ओतूर, रोहोकडी, डिंगोरे, आंबेगव्हान, पाचघर, उंब्रज, खामुंडी आणि उदापूर परिसरात तापमानाचा पारा वाढलेला होता. मात्र, आज दुपारपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे काढणी करून शेतातच साठवून ठेवलेला कांदा भिजण्याची भीती निर्माण झाली आहे. कांदा जर पावसात भिजला, तर त्याला मोड येणे किंवा सड लागणे असे प्रकार घडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. ​ढगाळ वातावरण पाहताच शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह शेताकडे धाव घेतली. घरातील अबालवृद्धांनी एकत्र येऊन कांद्याच्या आरणीवर प्लास्टिक कागद टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

अचानक मागणी वाढल्याने स्थानिक बाजारपेठेत प्लास्टिक कागद मिळवण्यासाठीही शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा सुटल्याने प्लास्टिक कागद आरणीवर टिकवून ठेवणे शेतकऱ्यांसाठी जिकिरीचे ठरत आहे. अनेक ठिकाणी दगडांच्या आणि दोरीच्या सहाय्याने हे कागद बांधून ठेवले जात आहेत. यावर्षी कांद्याला मिळणारा भाव आणि निसर्गाची साथ यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. महागडी बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च करून पिकवलेला कांदा आता सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

​”वर्षभर मुलाप्रमाणे कांदा जपला, आता कुठे पीक हाती आले होते. पण या ढगाळ वातावरणामुळे काळजात धडधड वाढली आहे. जर पाऊस झाला, तर आमचे आर्थिक कंबरडे मोडेल,” अशी भावना ओतूर येथील कांदा उत्पादक शेतकरी शंकर हाडवळे या शेतकऱ्याने बोलताना व्यक्त केली.

​हवामान विभागाने येत्या २४ ते ४८ तासांत राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याचाच प्रत्यय ओतूर परिसरात येत असून, ढगांच्या गडगडाटासह पावसाची चिन्हे दिसत आहेत. यामुळे केवळ कांदाच नव्हे, तर शेतात काढून ठेवलेल्या इतर पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

हे सुद्धा वाचा : हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना

Web Title: Onion farmers in junnar taluka have expressed concern due to cloudy weather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Farmers
  • onion
  • Rain News

संबंधित बातम्या

उत्रौली-वडगाव डाळ प्रकल्पाला पूर्णविराम, राज्य शासनाचा मोठा निर्णय; तरुणांची संधी हुकली
1

उत्रौली-वडगाव डाळ प्रकल्पाला पूर्णविराम, राज्य शासनाचा मोठा निर्णय; तरुणांची संधी हुकली

शेतकऱ्यांसाठी धावले आमदार शेळके, आंदर मावळातील नुकसानाची केली पाहणी; प्रशासनाला दिले आदेश
2

शेतकऱ्यांसाठी धावले आमदार शेळके, आंदर मावळातील नुकसानाची केली पाहणी; प्रशासनाला दिले आदेश

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी
3

अतिवृष्टीने कराडच्या खरीपाला ब्रेक; 31 हजार हेक्टरपैकी केवळ 24.60 टक्के पेरणी

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?
4

पुण्यात पावसाने घेतली विश्रांती; गुरुवारपासून गायब झालेला पाऊस आता कधी येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.