Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी धावले आमदार शेळके, आंदर मावळातील नुकसानाची केली पाहणी; प्रशासनाला दिले आदेश

आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 06:20 PM
शेतकऱ्यांसाठी धावले आमदार शेळके, आंदर मावळातील नुकसानाची केली पाहणी; प्रशासनाला दिले आदेश

शेतकऱ्यांसाठी धावले आमदार शेळके, आंदर मावळातील नुकसानाची केली पाहणी; प्रशासनाला दिले आदेश

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. विशेषतः आंदर मावळ भागात अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

 

सततच्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी शेती वाहून गेली. भातशेतीचे मोठे नुकसान झाले, तर काही भागांत दरडी कोसळून रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात यंदाचा पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठे संकट ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने केलेली लागवड आणि मशागतीचे काम पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे.

आमदार सुनील शेळके यांनी आंदर मावळातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करत अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विलंब न करता पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

यापूर्वीही पाटण परिसरात दरड कोसळून जीवितहानी झालेल्या ठिकाणी तसेच लोणावळ्यातील पूरग्रस्त भागात जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली होती. पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळावी, पुनर्वसनाची प्रक्रिया गतीमान व्हावी आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. आता आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी संपूर्ण तालुक्यातील आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.

काम दर्जेदार,निर्धारित मुदतीत व्हावे

यावेळी सुरू असलेल्या कान्हे–वडेश्वर–सावळा रस्त्याच्या कामाचीही आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावे, याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना त्यांनी कडक शब्दांत सूचना दिल्या. पावसामुळे नागरिकांना कोणताही अतिरिक्त त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पाहणीदरम्यान मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडताना शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा : पाटण दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घटनास्थळी भेट; मृतांच्या वारसांसाठी तब्बल…

शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू

प्रत्येक नुकसानग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. अतिवृष्टीच्या संकटात प्रत्यक्ष शेतात, गावात आणि नागरिकांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी करणाऱ्या आमदारांच्या या दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

Web Title: Mla sunil shelke has inspected the damage in andar maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.