Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन; पुणे जिल्ह्याला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2026 | 11:06 AM
घाट विभागाला ऑरेंज, शहराला यलो अलर्ट

घाट विभागाला ऑरेंज, शहराला यलो अलर्ट

Follow Us
Follow Us:

पुणे : संततधार पावसाने पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, दक्षिण-पश्चिम मान्सूनने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्ये आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वाढत्या सक्रियतेमुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागाला ऑरेंज, तर शहरासह उर्वरित जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या मध्य प्रदेशातील चक्रीय स्थितीपासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवामानाची द्रोणीय रेषा विस्तारलेली असल्याने राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात अधिकृतरित्या मान्सून दाखल झाल्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. रात्रभर सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते, उद्याने आणि परिसर ओलाचिंब झाले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट, तर घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

शहरातील कमाल तापमानात झाली लक्षणीय घट

पावसाच्या आगमनामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात तब्बल पाच ते सहा अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. बुधवारी शहराचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरातील काही भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

तापमान 30 अंशांवर राहण्याचा अंदाज

पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. २५) कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुढील दोन-तीन दिवस मान्सून सक्रीय

हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मान्सून आणखी सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी

Web Title: Orange alert for rain in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Climate Change
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
2

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
3

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
4

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.