पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर झपाट्याने साथीचे आजार वाढू लागतात. सर्दी खोकला, ताप, उलट्या, जुलाब, डेंग्यू, मलेरिया झाल्यानंतर शारीरिक आरोग्य बिघडून जाते. आजारांची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते. त्यामुळे पावसाळ्यात विकतचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नये. चुकीच्या वेळी खाणे, तणाव आणि झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात थोडासा बदल करणे फार आवश्यक आहे. नियमित या पदार्थांचे पाणी प्यायल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा चांगली राहील. (फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या 'या' पदार्थांचे पाणी

भारतीय घरांमध्ये मागील अनेक वर्षांपासून दैनंदिन आहारात हळदीच्या दुधाचा समावेश केला जात आहे. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.

वारंवार गॅस, अपचन किंवा पोटात जळजळ इत्यादी सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. टोपात पाणी गरम करून त्यात ओवा टाका आणि १० मिनिट उकळी काढा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाण्याचे सेवन केल्यास गॅसच्या समस्येपासून सुटका मिळेल.

दालचिनी आणि मधाचे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. दालचिनीमध्ये असलेले घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, तर मधाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

पचनासाठी बडीशेप अतिशय प्रभावी मानली जाते. बडीशेपचे पाणी प्यायल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते.

तणाव, निद्रानाश किंवा मायग्रेनने त्रस्त असाल तर नियमित कॅमोमाइल चहा प्यावा. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक स्नायूंना आराम देतात आणि मज्जासंस्थेला शांत करतात.






