Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पहिल्याच दिवशी 8 हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना

जनगणना कायदा १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, प्रभावी धोरणनिर्मिती व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वसनीय माहितीचा (डेटा) संग्रह अत्यावश्यक आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2026 | 01:48 PM
पहिल्याच दिवशी ८ हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना

पहिल्याच दिवशी ८ हजारांहून अधिक नागरिकांची स्व-गणना

Follow Us
Follow Us:

पुणे : भारताच्या १६ व्या जनगणनेला 1 मे पासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यात आठ हजारांहून अधिक नागरिकांनी स्व-गणना पूर्ण केली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिली.

जनगणना कायदा १९४८ अंतर्गत राबविण्यात येणारा हा महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम असून, प्रभावी धोरणनिर्मिती व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वसनीय माहितीचा (डेटा) संग्रह अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी ही आपली जबाबदारी समजून स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राऊत यांनी केले.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यास जिल्ह्यात 1 मे रोजी प्रारंभ झाला असून, नागरिकांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १५ मे २०२६ पर्यंत स्व-गणना पूर्ण करावी. ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलन करणार आहेत.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत यंदा जनगणना व्यापक प्रमाणात डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच स्व-गणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना आपला कौटुंबिक तपशील ऑनलाइन भरता येणार आहे.

कुटुंबातील कोणताही एक सदस्य सुमारे १५ ते २० मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. माहिती सादर केल्यानंतर स्व-गणना आयडी (एसईआयडी) तयार होऊन तो नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलवर पाठवला जाईल. या प्रक्रियेसाठी कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, घरगुती यादीकरणासाठी जिल्ह्यात सुमारे १३ हजार प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून पाच-स्तरीय प्रशिक्षण प्रणाली राबविण्यात आली आहे. डेटा सुरक्षेसाठी बहु-स्तरीय संरक्षण व्यवस्था लागू करण्यात आली असून, केवळ अधिकृत कर्मचाऱ्यांनाच सुरक्षित प्रवेश दिला जाणार आहे.

Navi Mumbai: सातत्याने कामांना मुदतवाढ का? कंत्राटदारांच्या मुदतवाढीवरून सुतारांचा संताप, स्थायी समितीत उपस्थित केला सवाल

कशी होणार जनगणना?

केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जरी मूळतः २०२१ मध्ये करण्याचे नियोजन असले तरी, ती सहा वर्षांनी पुढे ढकलण्यात आली आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे २०२१ ची जनगणना पुढे ढकलण्यात आली. पहिल्यांदाच, ही पूर्णपणे डिजिटल जनगणना असेल, ज्यामध्ये जातींची जनगणना समाविष्ट असेल.

Web Title: Over 8000 citizens conduct self enumeration in pune on the very first day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Census Notification
  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क
1

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
2

Maharashtra Breaking News Today 2026: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
3

Career News: पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी
4

DSP Trophy Pune: ढोले पाटील अकादमीचा उपांत्य फेरीत प्रवेश; सार्थक हाबळेची शानदार खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.