Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: पुण्यातील नदी प्रदूषणाची पर्यावरण मंत्र्यांकडून गंभीर दखल; म्हणाले, “… कोणतीही तडजोड केली जाणार नाही”

नद्यांच्या शुद्धतेसाठी मैला जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्याची गरज असून, महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करावे, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2025 | 09:55 PM
Pune: पुण्यातील नदी प्रदूषणाची पर्यावरण मंत्र्यांकडून गंभीर दखल; म्हणाले, “… कोणतीही तडजोड केली जाणार नाही”
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रासायनमिश्रीत  सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पर्यावरण आणि आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडत प्रदूषण रोखण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे, असा थेट सवाल केला.

त्याची गंभीर दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही उद्योगाला प्रक्रिया न करता थेट रासायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडण्याची मुभा दिली जाणार नाही. अशा उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, कोणत्याही विशिष्ट प्रकरणाची तक्रार आल्यास तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

नद्यांमधील वाढते प्रदूषण थांबवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) काय भूमिका बजावणार, तसेच दोषी उद्योगांवर कारवाई कधी केली जाणार, यावर आमदार जगताप यांनी सरकारला जाब विचारला. यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी कठोर भूमिका घेत पर्यावरण रक्षणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

नद्यांच्या शुद्धतेसाठी मैला जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्याची गरज असून, महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी सूचित केले. नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या कंपन्या आणि व्यवसायांवर लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही मुंडे यांनी दिले.

नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा

राम नदी आणि मुळा – मुठा नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात विभागीय आयुक्त  डाॅ. महेश पुलकुंडवार यांच्याबराेबर लवकरच संयुक्त बैठक हाेणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील  राम नदी – मुळा नदी संगम येथील जागेची संयुक्त पाहणी खासदार कुलकर्णी यांनी केली. यावेळी महापािलका आयुक्त राजेंद्र भोसले , जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मित…”; नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा

पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून 44 किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे 4700 कोटी रुपये निधी आवश्यक आहे. या कामाचा एकंदरीत विकास आराखडा झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे व 200 वर्षांचे जुनी वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री  सी. आर. पाटील यांच्याकडे  तक्रार केल्याची माहीती खासदार कुलकर्णी यांनी केली.

Web Title: Pankja munde strict action take against industries will not allowed to discharge sewage into the river in chemical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Pankaja Munde
  • PCMC News
  • pune news

संबंधित बातम्या

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
1

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
3

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
4

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.