Diwali 2025: दिवाळीच्या उत्साहाने बाजारपेठा गजबजल्या; खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी
तळेगाव दाभाडेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
रानफुलांच्या सुवासाने वातावरण सुगंधित
केरसुणीला ४० ते ७० रुपये भाव
तळेगाव दाभाडे: दिवाळीच्या आगमनाने तळेगाव दाभाडे शहर आणि मावळातील घरोघरीतळेगाव दाभाडे उत्साह फुलवला आहे. थंडीत झगमगणाऱ्या घरांची, इमारतींची आणि दुकानेच्या बाहेरील विद्युत रोषणाई, रांगोळीने सजलेली अंगणे, मातीच्या किल्ल्याच्या बांधणीची तयारी तसेच खरेदीसाठी गजबजलेल्या बाजारपेठांमुळे शहरभर चैतन्याचे वातावरण पाहायला मिळते आहे.
नवरात्रानंतर पावसाने उघडी दिल्याने मावळात फुललेल्या रानफुलांच्या सुवासाने वातावरण सुगंधित झाले आहे. अश्विन पौर्णिमेपासून ठिकठिकाणच्या मंदिरात सुरू झालेल्या काकडा आरत्यांच्या सुरांनी दिवाळीच्या आनंदात भर घातली आहे. भाद्रपदी बैलपोळ्यानंतर मूर्तीकारांनी दिवाळीसाठी पणत्या, किल्ले, चित्रे आणि लक्ष्मीच्या मूर्तींची तयारी सुरू केली आहे.
दिवाळी जवळ येत असल्याने मॉल, किराणा, कपडे आणि मिठाईच्या दुकाने मालाने भरलेली दिसत आहेत. विविध रंगांचे आकर्षक आकाश कंदील, पणत्या, कृत्रिम फुलांच्या माळा आणि तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. किराणा माल आणि सुकामेव्याचे भाव यंदा स्थिर असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत गती जाणवते आहे. रेडीमेड कपड्यांच्या दुकानांसमोरील पुतळ्यांवर रंगीबेरंगी, फॅशनेबल कपडे प्रदर्शित केले गेले आहेत. बच्चेमंडळी आणि तरुणाई कपडे खरेदीसाठी पालकांसह गर्दीत दिसत आहेत.
चाकण रस्ता, मारुती मंदिर चौक, स्टेशन रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वराळे रस्ता आणि नगरपरिषद कार्यालयासमोर दिवाळीच्या फटाक्यांची दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी दिवाळीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य, पणत्या, रांगोळी आणि केरसुणी विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. खरेदीसाठी पुढील दोन दिवसांत बाजारपेठेत उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केरसुणीला ४० ते ७० रुपये भाव
यंदा जोरदार पावसामुळे शिंदाडाच्या झाडाची पाने वाळवता आल्याने पारंपरिक केरसुणी थेट कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातून आणावी लागली. आकारानुसार त्यांचा भाव ४० ते ७० रुपये प्रतिनग आहे, मात्र ग्राहक कमी भावाची अपेक्षा करतात. वाहतूक खर्च वगळता किमान १० रुपये नफा अपेक्षित आहे, असे तळेगावातील पारंपरिक केरसुणी विक्रेत्या शोभा जाधव यांनी सांगितले.
दिवाळी भेटवस्तूंमध्ये बदलता ट्रेंड
दिवाळी येतेय…. दिवाळी म्हणजे उजेडाचा आणि आनंदाचा सण! या सणात भेट देणे म्हणजे आपुलकीचा, प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा पारंपरिक मार्ग. मात्र यावर्षीच्या भेटवस्तू ट्रेंडमध्ये एक नवा बदल दिसून येतो आहे. नागरिकांचा कल आता केवळ सजावटीच्या वस्तूंवर न थांबता इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी हॅम्पर्सकडे झुकत आहे.
Diwali 2025: सजावटीतून सजगतेकडे; दिवाळी भेटवस्तूंमध्ये बदलता ट्रेंड
बाजारात वाढती मागणी
गेल्या काही वर्षांत ‘गिफ्ट हॅम्पर्स’ ही संकल्पना अधिक आकर्षक बनली आहे. आधुनिक पॅकिंगमध्ये सादर केलेल्या पारंपरिक मिठाई आणि ड्रायफ्रूट बॉक्सेसना अधिक मागणी मिळत आहे. या वर्षी इको-फ्रेंडली आणि आरोग्यदायी हॅम्पर्सच्या विक्रीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले. अगदी ३०० रुपयांपासून तीन ते चार हजार रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. रिटेल आणि होलसेल नुसार दरात बदल होतात.