Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीनशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण; पुण्यातील ‘या’ पेशवेकालीन मंदिर समूहाबद्दल तुम्हाला माहितीये का?

Shiv Temples: मंदिर समूहातील लक्ष्मीनारायण मंदिराला मुठा नदीच्या पुराचा फटका बसल्याने त्याचे अनेक वेळा पुनर्बांधकाम झाल्याचेही संदर्भ आढळतात. त्यामुळे नदीकाठच्या या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीसमोरील आव्हाने जुनीच असल्याचे दिसून येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 30, 2026 | 02:35 AM
अमृतेश्वर मंदिर समूह

अमृतेश्वर मंदिर समूह

Follow Us
Follow Us:

अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह पुण्यातील महत्त्वाचे स्थळ
या मंदिर समूहाचा ग्रेड-१ वारसा वास्तू म्हणून समावेश
चित्राव कुटुंबाशी जोडला जातो या परिसराच्या इतिहासाचा संबंध

पुणे/गायत्री पवळे: पुण्याच्या शनिवार पेठेतील आपटे घाटाजवळ, मुठा नदीच्या काठावर असलेला (Shiv Temples) अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचे स्थळ आहे. पेशवेकालीन पुण्याच्या विस्तारासोबत विकसित झालेल्या या मंदिर समूहात विविध काळात उभारण्यात आलेली मंदिरे आजही एकत्र पाहायला मिळतात. पुणे महापालिकेच्या वारसा यादीत या मंदिर समूहाचा ग्रेड-१ वारसा वास्तू म्हणून समावेश करण्यात आला आहे.

या परिसराच्या इतिहासाचा संबंध चित्राव कुटुंबाशी जोडला जातो. उपलब्ध वास्तु-अभ्यासानुसार मंदिर समूहातील सिद्धेश्वर मंदिराची उभारणी इ.स. १७३८ मध्ये झाली. त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिराची भर पडली आणि इ.स. १७७८ मध्ये अमृतेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली. पुढील काळात हनुमान आणि विठ्ठल मंदिरांचाही या समूहात समावेश झाला. त्यामुळे हा परिसर केवळ एका मंदिरापुरता मर्यादित नसून मराठा-पेशवा काळातील धार्मिक वास्तुकलेचा एक महत्त्वाचा समूह मानला जातो.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसल्यास मंदिरात प्रवेश नाकारता येतो का? उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट उत्तर

अमृतेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून त्याची वास्तुरचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात नंदी मंडप, अर्धमंडप, मुख्य मंडप आणि भूमिगत गर्भगृह अशी रचना असल्याचे वास्तु-अभ्यासात नमूद आहे. स्थानिक दगडाचा वापर आणि मराठा स्थापत्यशैलीसोबत नागर तसेच इतर स्थापत्य प्रभावांची सांगड या वास्तूत दिसून येते. भूमिगत गर्भगृह हे मंदिराचे विशेष आकर्षण मानले जाते.
मंदिर समूहातील लक्ष्मीनारायण मंदिराला मुठा नदीच्या पुराचा फटका बसल्याने त्याचे अनेक वेळा पुनर्बांधकाम झाल्याचेही संदर्भ आढळतात. त्यामुळे नदीकाठच्या या ऐतिहासिक वास्तूंच्या देखभालीसमोरील आव्हाने जुनीच असल्याचे दिसून येते.

आज शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही हा मंदिर समूह अनेक पर्यटक आणि पुणेकरांच्या दृष्टीने तुलनेने अपरिचित आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याचे महत्त्व लक्षात घेता नियमित देखभाल, वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन, परिसराची स्वच्छता आणि इतिहासाची माहिती देणारे फलक यांची गरज आहे.

असं एक मंदिर जिथे देवासोबत उंदरांचीही पूजा केली जाते; काय आहे यामागची प्रथा परंपरा ?

पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना शनिवारवाडा, लाल महाल यांच्याबरोबरच अशा तुलनेने दुर्लक्षित वास्तूंकडेही पाहणे आवश्यक आहे. अमृतेश्वर-सिद्धेश्वर मंदिर समूह हा पुण्याच्या धार्मिक परंपरेबरोबरच शहराच्या स्थापत्य आणि सामाजिक इतिहासाची दगडी साक्ष देणारा वारसा आहे. त्यामुळे या वारशाचे जतन करणे ही केवळ धार्मिक संस्थेची नव्हे, तर संपूर्ण शहराची जबाबदारी ठरते.

Web Title: Peshwa era amruteshwar siddheshwar shiva temples shaniwar peth pune navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • pune news
  • shiv temples

संबंधित बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
1

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
2

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
3

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना
4

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.