Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! ‘माझी वसुंधरा’ अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक

राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पिंपरी-चिंचवडने प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची 'हॅट्ट्रिक' साधली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2026 | 12:40 PM
पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! 'माझी वसुंधरा' अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक

पिंपरी-चिंचवड महापालिका राज्यात अव्वल! 'माझी वसुंधरा' अभियानात सलग तिसऱ्यांदा प्रथम क्रमांक

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पिंपरी-चिंचवडने प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महापालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

 

दिमाखदार सोहळ्यात गौरव

२१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित एका विशेष राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. महापौर रवि लांडगे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुरस्काराची राशी स्वीकारली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव जयश्री भोज, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

“सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम येणे हा प्रत्येक पिंपरी-चिंचवडकरासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश केवळ प्रशासनाचे नसून शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि उद्योगांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे. हा सन्मान शहरवासियांच्या पर्यावरणप्रेमी वृत्तीला समर्पित आहे.” — रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड

अशी झाली कामगिरीची मोजणी

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात ‘पंचमहाभूतांवर’ आधारित निकषांवर शहराची चाचणी घेण्यात आली. यात प्रामुख्याने खालील बाबींमध्ये शहराने उत्कृष्ट कामगिरी केली

  • कचरा व्यवस्थापन : स्त्रोतस्थानी कचरा विलगीकरण आणि निर्माल्य पुनर्प्रक्रिया.
  • प्रदूषण नियंत्रण : एकल-वापर प्लास्टिकमुक्ती आणि वायू गुणवत्ता सुधार.
  • पाणी व ऊर्जा : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलसंधारण आणि सौरऊर्जेचा वाढता वापर.
  • हरित पट्टा: शहराच्या वृक्षारोपणात आणि हरित क्षेत्रात केलेली लक्षणीय वाढ.
“शाश्वत विकासासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक अंमलबजावणीवर भर दिला आहे. जनसहभागामुळेच आम्ही हे उद्दिष्ट गाठू शकलो. भविष्यात पिंपरी-चिंचवडला अधिक हरित आणि प्रदूषणमुक्त बनवण्याचा आमचा निर्धार आहे.”— श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

विषय समित्यांवर सदस्यांची निवड

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली. “महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नव्याने निवड झालेले सदस्य शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक कार्य करतील,” असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation has come first in the majhi vasundhara campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
1

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
2

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
3

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
4

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.