Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Building Collapse: पिंपरी-चिंचवडमधील मोशीत इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली १४ ते १५ जण अडकल्याची भीती

Moshi Building Collapse: प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 08, 2026 | 05:15 PM
Pimpri Chinchwad, Moshi, Building Collapse, Pune Rain,

Pimpri Chinchwad, Moshi, Building Collapse, Pune Rain,

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे
  • मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज
  • अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती निवारणाचे पथक घटनास्थळी दाखल
PCMC Building Collapse: गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागात एक इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. मोशी कचरा डेपोजवळ ही इमारत आहे. घटना घडली त्यावेळी इमारतीत त्यावेळी काही लोक असल्याची माहिती आहे.

Tukaram Mundhe News: जर एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? तुकाराम मुंढेंनी दिले उत्तर

इमारत कोसळल्यानंतर त्याच्या ढिगाऱ्या खाली हे लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि पिंपरी चिंचवड अग्निशमन दल यांना देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास 14 ते 15 जण अडकल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती निवारणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचाव कार्य ही सुरू केले आहे. दोन्ही पथकांकडून सध्या संयुक्त पणे तिथे बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. परिसरात या घटनेनंतर भीतीचे वातावरण असून पावसाळ्यात जनतेने काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

ही घटना दुपारच्या वेळेत घडल्याने अनेक कर्मचारी इमारतीत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून, घटनास्थळी युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असून ते जिवंत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून अत्यंत काळजीपूर्वक ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

‘हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले’; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेसाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले असून संयुक्तपणे बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

घटनास्थळी महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

Web Title: Pimpri chinchwad moshi building collapse heavy rain pune orange alert people trapped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • building collapse
  • moshi
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच
1

लोणावळा, मावळ अन् खेडमध्ये ‘पीडीआरएफ’ची धाडसी मोहीम, शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले; शोधकार्य सुरूच

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद
2

वाशीतील दुर्घटनाग्रस्त ‘गीता अपार्टमेंट’ अखेर जमीनदोस्त; नमुंमपाची मोठी कारवाई, सुरक्षेसाठी वाशी-कोपरखैरणे मार्ग काही तास बंद

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…
3

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश
4

पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला ‘अलर्ट’ राहण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.