Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Shortage : पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी ठेवा साठवून; उद्या शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 12:01 PM
पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी ठेवा साठवून; उद्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

पिंपरी-चिंचवडकरांनो, पाणी ठेवा साठवून; उद्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Follow Us
Follow Us:

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवारी (दि. ४) पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती एमआयडीसी प्रशासनाने दिली आहे.

दुरुस्तीच्या कामाचा फटका पिंपरी-चिंचवडसह भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ओएफडीआर परिसराला बसणार आहे. केवळ गुरुवारचाच नव्हे, तर दुरुस्ती कामांचा परिणाम पुढील दोन दिवसही जाणवणार आहे. शुक्रवारी (दि. ५) आणि शनिवारी (दि. ६) या संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Smart City Mission Handover : स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात; ३० हून अधिक अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी

दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 5 जून आणि 6 जून रोजीदेखील संबंधित परिसरांमध्ये पाणी कमी दाबाने किंवा अपुऱ्या स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून नागरिकांनी आतापासूनच आवश्यकतेनुसार पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

कोणत्या भागांत जाणवणार तुटवडा?

पिंपरी-चिंचवडसह कासारवाडी, भोसरी, देहूरोड, निगडी, सीएमई, आर अँड डी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ओएफडीआर परिसराला बसणार आहे. या भागात तुटवडा जाणवणार आहे.

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा

दुसरीकडे, संभाजीनगर जिल्ह्यात मृद जलसंधारणाची कामे वेळत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने समन्वय राखून काम करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध जलसंधारण उपचार उपाययोजना राबविणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेण्यात आला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था ! मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर प्रश्नचिन्ह, चालक-वाहक हैराण

Web Title: Pimpri city water supply to remain suspended tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Water supply

संबंधित बातम्या

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग
1

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा
2

मुख्यमंत्र्यांचा मजीप्रा अधिकाऱ्यांना थेट दम! छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेत दिरंगाई खपवून घेणार नाही; फडणवीसांचा कडक इशारा

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?
3

Navi Mumbai : नवी मुंबईत ‘सांडपाणी प्रक्रिया’ धोरणाला हरताळ; पालिकेचा पुन्हा बोरवेलवरच भर?

ऐन पालखी काळात गटाराचे पाणी रस्त्यावर; सासवडचे राजकारण तापले
4

ऐन पालखी काळात गटाराचे पाणी रस्त्यावर; सासवडचे राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.