एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची दयनीय अवस्था! मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर प्रश्नचिन्ह, चालक-वाहक हैराण
प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी खांद्यावर सांभाळणाऱ्या एसटी चालक-वाहकांच्याच विश्रांतीगृहाची अवस्था मात्र, अत्यंत दयनीय असल्याचे चित्र मुंबई सेंट्रल एसटी आगारात पाहायला मिळाले. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे कर्मचाऱ्यांना विश्रांती घेण मुश्कील झाले आहे. ‘आराम नाही, झोप पूर्ण नाही, अस्वच्छतेमुळे होणारे आजार अशा स्थितीत आम्ही ड्युटी करायची?’ असा सवाल चालक आणि वाहकांना केला आहे.चालक-वाहकांसाठी राखीव असलेल्या झोपण्यासाठी दिलेल्या गाद्यांमध्ये ढेकणांचा मोठा त्रास असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
Education News : किर्ती महाविद्यालयाचा अजब प्रकार, पास विद्यार्थींना केलं नापास; युवासेनेचा इशारा
ढेकणांमुळे रात्रभर नीट झोप मिळत नसल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा घेऊनच लागत आजारपणात असलेल्या वातानुकूलित कक्षातील एसीही बंद असल्याचा आरोप कर्मचायाांनी केला आहे. एसी नसल्याने बंदिस्त खोलीत उकाड्यामुळे श्वास घेणेही कठीण होते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रवाशांना सुखरूप आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनाच जर विश्रांतीच्या वेळी अशा हालअपेष्टा सोसाव्या लागत असतील, तर एसटी प्रशासनाच्च्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अंघोळीसाठी असलेली बाथरूमही अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहेत. स्वच्छतागृहात पाण्याचा निचरा होत नसल्याने तिथे उभे राहणेही कठीण झाले आहे. विश्रांतीगृहात असलेली लिफ्ट गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे वयस्कर कर्मचाऱ्यांना वर-खाली करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार चालक आणि वाहकांनी केली आहे. एसटी महामंडळाने कर्मचाच्यांच्या आरोग्य आणि कामगिरीचा विचार करून मुंबई सेंट्रल आगारातील विश्रांतीगृहाची तातडीने दुरुस्ती करावी, स्वच्छता राखावी आणि पाणी, एसी, लिफ्ट यांसारख्या मूलभूत सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रवाशामध्ये होणारे सत्ताचे वाद याचे प्रमाण सतत गाड्या लेट, वाढते अपघात, चालक वाढले आहे. या चालक आणि वाहकांना योग्य झोप आणि आराम मिळत नसेल तर त्याची चिडचिड होणारच. यावर आता शासनाने तत्काळ उपाय शोधायला हवा, असे मत राजेश निर्मळ यांनी व्यक्त केले आहे.






