
PMC Election Result 2026: पुण्यात मतमोजणी केंद्रावर राडा! ठोंबरेंनी केला EVM मशीन बदलल्याचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांनी असा दावा केला आहे की, मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या आहेत. मशीनचे नंबर जूळत नाहीत. रुपाली ठोंबरे यांनी केलेले हे आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे सर्वत्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच रूपाली ठोंबरे यांनी मशीनचे नंबर जूळत नसल्याचा अतिशय गंभीर दावा केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे निकाल प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. रुपाली ठोंबरे यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे प्रभाग क्रमांक २५ च्या मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी तातडीने थांबवण्यात आली. या घटनेमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय.
यावेळी रूपाली ठोंबरे आणि गणेश भोकरे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यावेळी रूपाली ठोंबरे आणि गणेश भोकरे यांचा पोलिसांसोबत वाद देखील झाला. या गोंधळामुळे मतमोजणी केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक २० मधून चार जण विजयी झाले आहेत. प्रभाग क्र. २० शंकर महाराज मठ बिबेवाडी या एकाच प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. ज्यामध्ये राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे या विजयी उमेदवारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी देखील दणदणीत विजय मिळवला आहे. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला. त्यामुळे तीन ठिकाणी विजय मिळवलेल्या भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव घुले यांनी धक्का दिला आहे.