Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई

PMP Bus: बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2025 | 09:14 PM
Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई
Follow Us
Follow Us:

पुणे महानगर परिवहन महामंडळाने लागू केले नवीन नियम
बस चालक मोबाईलवर बोलत असताना झाला होता अपघात
पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तसेच खाजगी बस पुरवठादारांच्या चालक सेवकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संचालक पीएमपीएमएल यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास थेट निलंबन करण्यात येणार आहे. काही चालक मोबाईल आणि हेडफोनचा वापर  करताना आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर एका बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी  तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चालकांसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत

चालक सेवकांनी ड्युटीवर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल फोन त्या शेड्युलवरील वाहक सेवकाकडे जमा करणे बंधनकारक राहील.

ड्युटी संपल्यानंतर वाहकाकडून मोबाईल फोन परत करण्यात येईल.

चालक सेवक ड्युटीवर असताना मोबाईल,हेडफोन वापरताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.

आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खाजगी बस पुरवठादारांनाही या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आता तुम्हाला घरबसल्या काढता येणार ‘PMP’चे तिकीट

पीएमपी प्रवाशांना अ‍ॅपवरून तिकीट काढण्याच्या सेवेबरोबरच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाइन तिकीट व बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. सुरूवातीला पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन दिसणारी यंत्रणा गुगलसोबत विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण काही तांत्रिंक अडचणींमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर पीएमपीने स्वत: प्रवाशांच्या सोयीसाठी अॅप बनवले आहे. अॅपच्या माध्यमातून  या  बसची ‘रिअल टाइम’ माहिती दिली जाणार आहे.

पुणेकरांनो आता तुम्हाला घरबसल्या काढता येणार ‘PMP’चे तिकीट; प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पीएमपी अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने प्रवास करायचा आहे, त्या बसची माहिती घरबसल्या पाहता येणार आहे. सोबतच तिकीटही काढता येणार आहे.  ज्या प्रवाशांनी घरबसल्या तिकीट काढले आहे, त्यांनी प्रवास करता वाहकाला क्युआर कोड दाखवल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल. या अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  विशेष म्हणजे, या अॅपवर पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीही  मिळणार आहे.

Web Title: Pmp drivers will suspended if use mobile phones and headphones while driving pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 09:11 PM

Topics:  

  • crime news
  • PMPML
  • Pune

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.