Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

पुणे जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार की नव्या आणि तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 11, 2026 | 05:24 PM
Pune News, Zilla Parishad, Medical Aid, Rural Health care,

Pune News, Zilla Parishad, Medical Aid, Rural Health care,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीचा पुण्यामध्ये विजय
  • ७३ पैकी तब्बल ५१ गटांमध्ये विजय
  • अध्यक्षपदासाठी पडद्यामागील हालचालींना वेग
पुणे : आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ७३ पैकी तब्बल ५१ गटांमध्ये विजय मिळवत पक्षाने एकहाती सत्ता काबीज केली असून, आता सर्वांचे लक्ष अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे.(Political News)  पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. निकाल लागताच अध्यक्षपदासाठी पडद्यामागील हालचालींना वेग आला असून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Pune News)

अध्यक्षपदासाठी पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार की नव्या आणि तरुण चेहऱ्याला नेतृत्वाची धुरा सोपवली जाणार, याबाबत उत्सुकता आहे. अध्यक्षपदासोबतच उपाध्यक्ष आणि विविध सभापतीपदांसाठीही इच्छुकांची संख्या लक्षणीय असल्याने अंतर्गत चर्चा निर्णायक ठरणार आहेत.

हे देखील वाचा :

दौंड तालुक्यातील खडकी गटातून वीरधवल जगदाळे, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी गटातून विवेक वळसे पाटील, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गटातून सुजाता पवार, इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून अंकिता हर्षवर्धन पाटील, काटी गटातून श्रीमंत ढोले, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गटातून शांताराम इंगवले तसेच भोर तालुक्यातील भोंगवली गटातून विक्रम खुटवड यांसारखे अनुभवी सदस्य पुन्हा एकदा सभागृहात पोहोचले आहेत. यापैकी काहींना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मोठा अनुभव असून, त्यांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : 

दुसरीकडे, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेल्या तरुण सदस्यांची संख्याही लक्षणीय आहे. डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तुषार रमेश थोरात, यशराज आप्पासाहेब जगदाळे, सुनीता बुट्टे-पाटील, करण खलाटे आदी नवोदितांची नावेही चर्चेत आहेत. यापूर्वी काही वेळा पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्याला अध्यक्षपदाची संधी देण्याचा प्रयोग यशस्वी ठरला होता. त्यामुळे तरुण नेतृत्वाला संधी देऊन नवे समीकरण मांडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांत पक्षाला मिळालेल्या भरघोस यशामुळे त्या भागातील सदस्याला अध्यक्षपद देण्याची मागणीही काही कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. विशेषतः दौंड तालुक्यात ७ पैकी ६ गटांत विजय मिळवल्याने त्या भागाची राजकीय ताकद अधोरेखित झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजकीय श्रद्धांजली म्हणून या पट्ट्यातील सदस्याला संधी द्यावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

Web Title: Politics begins within ncp party for the post of president in pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • NCP Politics
  • political news
  • pune news

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.