Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार; प्रशांत जगताप यांचा विश्वास

प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, साहिल केदारी आणि शमिका जांभुळकर या चारही उमेदवारांनी नेताजीनगर आणि बोराडेनगर भागातील नागरिकांशी पदयात्रेच्या माध्यमांतून संवाद साधला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 10, 2026 | 10:49 AM
नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार; प्रशांत जगताप यांचा विश्वास

नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार; प्रशांत जगताप यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:
  • नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार
  • प्रशांत जगताप यांचा विश्वास
  • वानवडीत काँग्रेस उमेदवारांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखेविहार) मधील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, साहिल केदारी आणि शमिका जांभुळकर या चारही उमेदवारांनी नेताजीनगर आणि बोराडेनगर भागातील नागरिकांशी पदयात्रेच्या माध्यमांतून संवाद साधला. या चारही उमेदवारांचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केल्याचे पाहण्यास मिळाले.

यावेळी मागील १२ वर्षांपासून वानवडी साळुंखे विहार भागातील नागरिकांनी भाजपचे खासदार, आमदार, मंत्री झालेले पाहिले. पण या नेतेमंडळींच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे येथील भागाचा विकास होऊ शकला नाही. आज आम्ही प्रचाराच्या निमित्ताने नेताजीनगर, बोराडेनगर भागातील नागरिकांशी संवाद साधला असता, या नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचून दाखवला. त्याबाबत सांगायचे झाल्यास नेताजीनगर ही सोसायटी जवळपास ३० वर्षांपूर्वीची असून या सोसायटीचा पुनर्विकास झाला पाहिजे. मात्र, या महत्वपूर्ण प्रश्नांकडे भाजपच्या कोणत्याही नेत्यांने लक्ष दिले नाही. यामुळे आता निवडणुकीत नागरिकांनी भाजप नेत्यांना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन देखील नागरिकांना प्रशांत जगताप यांनी केले.

बोराडेनगर भागातील एकूणच परिस्थिती पाहता त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या पायभूत सुविधा देण्यात हे भाजपचे नेते अपयशी ठरले आहेत. या दोन्ही भागाचा विकास करण्यास आम्ही काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार कटिबद्ध असून आम्ही निवडून आल्यावर नक्कीच नेताजीनगर, बोराडेनगर भागाचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन प्रशांत जगताप यांनी दिले.

प्रशांत जगताप यांचा महायुतीवर निशाणा

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजप आणि महायुती सरकारवर विविध विषयांवरून विरोधक टीका करत आहेत. काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनीही सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे. ही योजना फक्त निवडणुका जिंकण्यासाठीच सुरू केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही योजना कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर गायब करतील. लाडक्या बहिणींना ते सावत्र बहिण करतील. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीत ज्या प्रकारे खडखडात झाला आहे. त्यानुसार त्यांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, असे जगताप म्हणाले. तसेच भाजप सरकारने लाडकी बहीण योजना मागे घेऊ नये, असंही त्यांनी नमूद केलं आहे. असे केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्या लाडक्या बहिणींची फसवणूक भाजपनं केली तर त्याच लाडक्या बहिणींना घेऊन आम्ही या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Prashant jagtap expressed confidence that he will transform netaji nagar and boradenagar areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • pune news

संबंधित बातम्या

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग
1

खडकी लष्करी तळावर ‘सांझा शक्ती’ संयुक्त सराव; आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “‘गोचीडासारखे वागणे त्यांना…”; हर्षवर्धन सपकाळांची ‘त्या’ उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
3

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…
4

Pune News: गप्प बसायचं नाही… आता! हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर आरोप; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.