
शहरात दररोज ६१ पीएमपी बसेस ब्रेकडाऊन
प्रवाशांचे सुरू आहेत अतोनात हाल
आठ महिन्यांत १४,८५१ वेळा पीएमपीच्या बस ब्रेकडाऊन
चंद्रकांत कांबळे/पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) शहरात सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य आधार असलेल्या पीएमपी बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पुणे,पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए या भागात पीएमपी मार्फत बसवेवा पुरवती जाते. परंतु या शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार झालेला आहे. २०२५ मध्ये १४ महिन्यांत तब्बल २४ हजार ५१६ वेळा पीएमपीच्या बस ब्रेकडाऊन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बस ब्रेकडाउन होण्याचे प्रमाण 53 वरून 61 झाल्याचे दिसून येत आहे.
या ब्रेकडाऊन घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बस ११,०१४ वेळा, तर पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस ३८३७ वेळा बंद पडल्या. याचा सरासरी विचार करता दररोज ६१ वेळा बस अचानक बंद पडतात, ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. या वारंवार होणाऱ्या ब्रेकडाऊनमुळे दिवसाचे नियोजन करणाऱ्या सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कार्यालय, शाळा, कॉलेज किंवा दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे.
Pune News: 30 PMP बसेसना टाटा, बाय-बाय; नेमके प्रकरण काय?
सतत बसमध्ये काही ना काही बिघाड होणे, अचानक बस बंद पडणे, टायर पंक्चर होणे,बसचे इंजिन गरम होणे, वायर कट होणे, पॉवर स्टेअरिंग ऑइल लिंक होणे या कारणास्तव बस पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बसला आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. एप्रिल महिन्यात स्वारगेट ते खानापूर या मार्गावर एमआयटी गेटजवळ पीएमपी बसच्या इंजिनने पेट घेऊन संपूर्ण बस जळाली होती. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर बसचे तोल जाऊन अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहेत. मार्गावर बस सोडताना पीएमपीच्या व्यवस्थापकांनी बसची प्राथमिक तपासणी करूणच सोडावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पीएमपीच्या ताफ्यातील सध्याची आकडेवारी
एकूण बस १९८९
ठेकेदारा मार्फत चालवले जाणारे बस १२८५
स्वयमालकीच्या बस ७०४
नविन स्वयमालकीच्या बस हळूहळू दाखल होत आहेत १०००
या ब्रेकडाऊनमध्ये सर्वाधिक ११,०१४ बसेस भाडेतत्वावरील
या ब्रेकडाऊनमध्ये सर्वाधिक बसेस भाडेतत्वावरील आहेत. आठ महिन्यात तब्बल ११,०१४ वेळा रस्त्यावर या बसेस बंद पडलेल्या आहेत.या बसेसवर नियमानुसार आणि किलो मिटर प्रमाणे आर्थिक दंड आकारण्यात येतो. असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ज्या गाडया जुन्या झाल्या आहेत त्या आम्ही स्कॅप करत आहोत. १००० नवीन गाडया दाखल होत असून ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरात लवकर हे प्रमाण कमी होताना दिसेल.
राजेश कुदळे,
मुख्य अभियंता,पीएमपी
बस अचानक बंद पडल्यामुळे आमची गैरसोय होते. महत्वाचं काम असेल आणि अचानकपणे बस बंद पडली तर वेळेवर काम होत नाही. पर्याय व्यवस्था सुद्धा लवकर होत नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यावर उपयायोजना करावे.
प्रदिप काळभोर, प्रवाशी
एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्यात पीएमपी आणि भाडेतत्वावरील ब्रेकडाऊनचे प्रमाण
महिने पीएमपी भाडेतत्वावरील एकूण
एप्रिल ५६१ १५३६ २०९७
मे ५६१ १३९९ १९५०
जून ४३७ १६९५ २१३२
जुलै ४२० १८९३ २३१३
ऑगस्ट ६६९ १४८० २१४९
सप्टेंबर २४४ ७९४ १०३८
ऑक्टोंबर ४७१ ११३३ १६०४
नोव्हेंबर ४७४ १०९४ १५६८
एकूण ३८३७ ११०१४ १४८५१
मागील सहा महिन्यात ऑक्टोबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत ९,६६५ येवढे बस ब्रेकडाउन झाले होते. त्यामध्ये पीएमपीच्या मालकीचे २,७६९ तर भाडेतत्वावरील ६,७६९ बसेसचा समावेश होता. सरासरी दररोज ५३ बस ब्रेकडाऊन होत असे. या पुढील आठ महिन्यात म्हणजेच एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ कालावधीत त्यात वाढ होऊन तब्बल १४,८५१ बसेस ब्रकडाऊन झालेल्या आहेत. त्यात पीएमपीचे ३,८३७ तर भाडेतत्वारील ११,०१४ बसेस ब्रेकडाऊन झालेले आहेत. ब्रेकडाऊनचे प्रमाण दररोज ५३ वरून ६१ झालेले आहे.या चौदा महिन्यात एकूण २४ हजार ५१६ वेळा बसचे बेकडाऊन झाले आहेत.