पीएमपीच्या ३० बस स्कॅप (फोटो- सोशल मीडिया)
पीएमपीएलच्या जुन्या गाड्या स्कॅप
वाहतुकीस अयोग्य ठरल्यामुळे काढून टाकण्यात आल्या
७०४ बसेस पीएमपीच्या मालकीच्या
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळच्या ताफ्यातील (PMP)३० जुन्या बसगाड्यांना मागील महिन्यात स्कॅप करण्यात आले आहे. या बसगाड्या १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आणि वाहतुकीस अयोग्य ठरल्यामुळे काढून टाकण्यात आल्या आहेत.सध्या पीएमपीच्या स्वय मालकीचे ७०४ बसेस आहेत. लवकरच आणखी ३९ बस स्कॅप करण्याच्या मार्गावर आहेत असे पीएमपी (Pune ) प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पीएमपीच्या नियमांनुसार कोणतीही बस १२ वर्ष पूर्ण झाले की तिची तांञिक पाहणी केली जाते.बस यंञणेच्या घडामोडी,देखभाल खर्च आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा विचार करूण निर्णय घेतला जातो.यंदा अशा जुन्या आणि देखभाल खर्च अधिक असलेल्या पीएमपीच्या स्वत:च्या मालकीच्या बसगाड्या स्कॅप करण्यात आले. स्कॅप केलेल्या बसगाड्यांमुळे सध्या पीएमपीच्या ताफ्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी केंद्र सरकारकडून एक हजार बसेस टप्प्या टप्प्याने येत आहेत.
Pune News : पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..
मागील महिन्यात १२ वर्ष पूर्ण झालेली पीएमपीच्या ३० बस स्कॅप केले असून अजून ३९ बस स्कॅप करण्याची प्रक्रिया चालू आहे.स्कॅप प्रक्रियेमुळे तांञिकदृष्ट्या अकार्यक्षम बसगाडयापासून मुक्तता होत असून प्रवाशांना अधिक चांगली सुविधा आणि पर्यावरणपूरक सेवा पुरविण्यावर भर दिला जात आहे.
राजेश कुदळे,
मुख्य अभियंता,पीएमपी
आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत एसटीकडून चार एकर जमीन पीएमपीएमएलला देण्यास मंजूरी मिळाली आहे. प्रस्तावनुसार, एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या जागेवर सुमारे ८० बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे. या निर्णयामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. बस आगारामुळे बस रॅपिंग, देखभाल व पार्किंगची सोय सुलभ होईल आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळण्यास मदत होईल.
Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
स्थानिक वाहनधारक तसेच प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांची परवानगी, जागेचे नकाशे मान्यता करणे व बांधकामाचा समावेश होईल. या प्रकल्पाचे वेळापत्रक आणि बांधकाम खर्च याबाबत अधिक माहिती पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.






