Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान, सतर्क! ‘प्राध्यापकांनी ‘या’ कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास…’; Pune विद्यापीठाचा इशारा

Pune: कुलगुरूंच्या आदेशानुसार संबंधित शिक्षक, कर्मचारी किंवा संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई, दंडात्मक शास्ती अथवा मान्यता स्थगितीची कारवाई केली जाऊ शकते, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 06:32 PM
Pune University

Pune University

Follow Us
Follow Us:
  • पुणे विद्यापीठाचा प्राध्यापकांना कडक इशारा
  • परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा
  • प्राध्यापक परीक्षाविषयक कामकाजास हजर राहत नसल्याचे निदर्शनास
आदित्य डुंबरे /Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सन २०२६ मधील हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने संलग्न सर्व महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांमधील प्राध्यापक आणि प्रशासनासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. पेपर सेटर (प्राश्निक), परीक्षक, नियामक, बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक किंवा (Pune) भरारी पथकाचे सदस्य म्हणून नियुक्त झालेल्या प्राध्यापकांनी परीक्षेच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा विद्यापीठाने दिला आहे.

मागील परीक्षांच्या दरम्यान विद्यापीठाकडून नियुक्ती करूनही अनेक प्राध्यापक विविध कारणांचा हवाला देत परीक्षाविषयक कामकाजास हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (३)(ब), (४) व (५) च्या तरतुदींनुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन कामात कसूर करणे किंवा आदेशाचे पालन न करणे हे गैरवर्तन मानले जाईल. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत केली जाईल.

कुलगुरूंच्या आदेशानुसार संबंधित शिक्षक, कर्मचारी किंवा संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई, दंडात्मक शास्ती अथवा मान्यता स्थगितीची कारवाई केली जाऊ शकते, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षांचे कामकाज वेळेत व पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी विद्यापीठाने ज्या प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे, त्यांना महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व संचालकांनी तातडीने कामासाठी कार्यमुक्त करावे, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.

विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थ्यांसाठीची वाय-फाय सुविधा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदकडून करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या डिजिटल सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत इंटरनेट सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुरज श्रीराम गायकवाड यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Pune Education News: विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

Web Title: Professors face disciplinary action for negligence in examination related work alert by pune univeristy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • pune news
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल
1

Pune Graduate Teachers Constituency: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५५ इच्छुकांकडून ९७ अर्जांची उचल

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
2

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
3

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान
4

Kabaddi: कबड्डी क्षेत्रात पुण्याचा दबदबा! आयुक्त नवीन किशोर राम यांनी केले ‘हे’ मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.