Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील ‘या’ ठिकाणी उलगडले जाणार…

पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 02:35 AM
Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील 'या' ठिकाणी उलगडले जाणार...

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील 'या' ठिकाणी उलगडले जाणार...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/सुनयना सोनवणे:  फुलपाखरांना निसर्गाने रंगांची उधळण करून सुंदर रूप दिले आहे. या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू सर्वांनाच आकर्षित करते. पावसाळ्यानंतर कोवळ्या उन्हात मुक्तपणे विहारनारी फुलपाखरे आपल्या परिसराची एकंदरीत गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगतात. तसेच त्यांच्या सौंदर्याव्यतिरिक्त फुलांच्या परागीकरणातही ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जिथे फुलपाखरू असतात तिथे जैवविविधता समृद्ध असते, असे मानले जाते. फुलपाखराला जगातील सर्वाधिक आकर्षक कीटकाचा मान मिळाला आहे. गेल्या काही वर्षात फुलपाखरांची वसतीस्थाने नष्ट होत असल्यामुळे त्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या फुलपाखरांना वाचविण्याची गरज आहे.

सप्टेंबर महिना हा ‘बिग बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. याद्वारे फुलपाखरांचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्या भागात कोणत्या प्रजातीची फुलपाखरे आढळतात, त्यांचा अधिवास इत्यादी संदर्भात अभ्यास केला जातो. फुलपाखरांचे आकर्षण असलेल्या देशभरातील निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन फुलपाखरांच्या माहितीचा संग्रह करावा आणि त्यातून फुलपाखरांच्या संवर्धनाला मदत व्हावी म्हणून हा उत्सव आयोजित करण्यात येतो.

पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. वेताळ टेकडी, सिंहगड खोरे, सासवड तालुका येथे फुलपाखरू वॉक आयोजित केले जाते. या वॉकमध्ये कॉमन पियरोट, लेमन पँसी, ब्लू मॉर्मन, पीकॉक पँसी यांसारख्या विविध प्रजातींचे निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
औंध येथील रहिवासी मनीषा कामदार यांनी सांगितले की, “सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे फुलपाखरे पाहण्यासाठी सर्वोत्तम महिने आहेत. मागील वर्षी आम्ही असेच उपक्रम अनुभवले होते आणि यंदाही आम्ही उत्सुकता आहे.” अमोल नारगोळकर यांचे सिपना फार्म हे फुलपाखरू निरीक्षणासाठी खास आकर्षण ठरणार आहे. “सकाळच्या पावसानंतर दुपारपर्यंत अनेक फुलपाखरे दिसतात. वेगवेगळी फुलपाखरे आकर्षित व्हावीत म्हणून आम्ही नवीन वनस्पतींची लागवडही सुरू केली आहे, असे नारगोळकर यांनी सांगितले.
पर्यावरणतज्ञ रजत जोशी यांच्या मते, सप्टेंबरच्या शेवटी पाऊस कमी होतो. त्यामुळे फुलपाखरांचे वैविध्य पाहायला मिळते. म्हणून या काळात कार्यशाळा, शालेय व महाविद्यालयीन उपक्रम आणि सार्वजनिक वॉक आयोजित केले जातील. फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी खास कार्यशाळाही होणार आहेत. कोंढवा येथील शालिनी गुलाटी म्हणाल्या, “मी सूक्ष्म हालचाली टिपण्यासाठी विशेष लेन्स घेतली आहे. छायाचित्रकार मित्रांसह या कार्यशाळेत सहभागी होणार आहे.”
नॅचरलिस्ट फाउंडेशनचे सचिन राणे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड येथे फुलपाखरांची शर्यत आयोजित केली आहे. यात सहभागींना फुलपाखराच्या जीवनचक्राचे टप्पे नमूद करून त्यांचे निरीक्षण सादर करावे लागणार आहे. दरम्यान, रानवा या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेचे संशोधन प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले की, “पुढील महिनाभर आम्ही फुलपाखरांनी भेट दिलेल्या फुलांचे निरीक्षण करू. तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील नर-मादी प्रमाणाचाही अभ्यास होईल. शहरी भागात आतापर्यंत १२५ प्रजातींची नोंद झाली आहे.” या विविध उपक्रमांमधून केवळ फुलपाखरांचे सौंदर्य अनुभवण्याची संधी नाही तर जैवविविधतेचे संवर्धन, वैज्ञानिक निरीक्षण आणि पर्यावरण जागरूकता याही बाबींना चालना मिळणार आहे.

Web Title: Pune big butterfly month september event navarashtra sepcial story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • birds
  • navarashtra special
  • Pune

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
2

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
3

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.