Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

बुरुड आळीत सध्या महिलांचे प्रमाण या व्यवसायात सर्वाधिक आहे. कुटुंबातील पुरुष पारंपरिक साधनांनी बांबू चिरण्याचे, साचे तयार करण्याचे काम करतात, तर महिला नक्षीकाम, आकार देणे आणि सजावट करण्याची जबाबदारी सांभाळतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2025 | 02:35 AM
Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी
Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे/पुणे: दिवाळी येतेय… कंदील, दिवे, तोरणे सगळ्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. अगदी काही दिवसांवर सण आला आहे. त्यामुळे बाजारात एकच लगबग सुरू आहे. शहरात दिवाळीची चाहूल लागली की प्रत्येक गल्लीबोळात कंदिलांचे रंगीत उजेड पसरतात. पण या कंदिलांच्या मागे असते हस्तकलेची, परंपरेची आणि आत्मनिर्भरतेची एक अनोखी कहाणी. शहरातील बुरुड आळी हे असेच ठिकाण आहे, जिथे पिढ्यान्‌पिढ्या बांबूपासून वस्तू तयार करण्याचा व्यवसाय जिवंत ठेवला गेला आहे. आज या परंपरेला आधुनिक स्वरूप देत इथल्या महिलांनी बांबूपासून बनवलेले वेगवेगळ्या आकारांचे, आकर्षक आणि पर्यावरणपूरक कंदील तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी या कंदिलांना मोठी मागणी असते.

बुरुड आळीत सध्या महिलांचे प्रमाण या व्यवसायात सर्वाधिक आहे. कुटुंबातील पुरुष पारंपरिक साधनांनी बांबू चिरण्याचे, साचे तयार करण्याचे काम करतात, तर महिला नक्षीकाम, आकार देणे आणि सजावट करण्याची जबाबदारी सांभाळतात. अनेकांनी हे कौशल्य घरगुती उद्योगात रूपांतरित केले आहे. दिवाळीचा काळ म्हणजे त्यांच्यासाठी कामाचा हंगाम असतो.

विशेष म्हणजे, आता या महिलांनी आसाममधून अनेक नवीन डिझाइनचे आणि आकारांचे कंदील आयात केले आहेत. या कंदिलांची किंमत साधारणतः २५० रुपयांपासून सुरू होते. तर पारंपरिक आकाराचे कंदील आणि त्यांचे साचे मात्र इथेच, बुरुड आळीत तयार केले जातात. हे स्थानिक कंदील आकारानुसार १५० ते ३०० रुपयांच्या दरम्यान विकले जातात. कंदील बनवण्यासाठी लागणाऱ्या बांबूच्या काड्याही येथे स्वतंत्रपणे विकल्या जातात. अनेक छोटे उद्योजक आणि विद्यार्थीदेखील येथे साहित्य खरेदी करण्यासाठी येतात.

वस्तू बनवण्यासाठी लागणारा बांबू राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही आयात केला जातो. बुरुड समाजाचा हा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून चालत आलेला आहे. पूर्वी बांबूच्या चाळण्या, टोपल्या, सूप, झाडू, इत्यादी घरगुती वस्तूंना मागणी होती. पण बदलत्या काळानुसार या पारंपरिक व्यवसायात आधुनिकतेचा स्पर्श आला आहे. आता इथल्या महिलांनी आपली कला पारंपरिक वस्तूंसोबतच कंदीलनिर्मितीकडेही वळवली आहे.

टिकाऊपणा, हलके वजन आणि पर्यावरणपूरक स्वरूप हे या कंदिलांची वैशिष्ट्ये आहे. कागद, प्लास्टिक किंवा फॅन्सी लाईट्सच्या तुलनेत बांबूचे कंदील अधिक नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण दिसतात. वर्षभर काही लोक घर सजावटीसाठी हे कंदील वापरतातच, पण दिवाळीच्या काळात मात्र त्यांची मागणी दुपटीने वाढते.

आज या महिलांनी आपला पारंपरिक व्यवसाय नव्या कल्पनांद्वारे जिवंत ठेवला आहे. बुरुड आळीतील बांबू कंदिलांनी शहराच्या दिवाळीला वेगळा रंग दिला आहे. असा रंग, जो परंपरा, कष्ट आणि सर्जनशीलतेच्या तेजाने उजळतो आहे.

‘लोक आता सगळ्यांपेक्षा वेगळा आणि उठून दिसणारा कंदील शोधतात. म्हणून बांबूच्या कंदिलांची मागणी वाढली आहे. हे कंदील सुंदर आहेतच, सोबत पर्यावरणासाठीही हितकारक आहेत.’

-चित्रा राजेश मोहिते,
बांबू कारागीर आणि व्यावसायिक, बुरुड आळी

Web Title: Pune burud lane womes bamboo latern for diwali 2025 navarashtra special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.