Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune शहरात 57 लाख झाडांची नोंद; तरी सावली ‘शोभेची’च! हवा शुद्ध करणाऱ्या देशी….

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2026 | 02:42 PM
Pune शहरात 57 लाख झाडांची नोंद; तरी सावली ‘शोभेची’च! हवा शुद्ध करणाऱ्या देशी….
Follow Us
Follow Us:

पुणे शहरात झाडांची संख्या ५७ लाखांहून अधिक
र्यावरणाच्या दृष्टीने त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे चित्र
मोठ्या प्रमाणात सजावटीच्या झाडांची लागवड

सुनयना सोनवणे /पुणे: पुणे शहरात झाडांची संख्या ५७ लाखांहून अधिक असल्याची नोंद असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या झाडांची लागवड होत असून हवा शुद्ध करणाऱ्या देशी वृक्षप्रजातींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे पुणेकरांना मिळणारी झाडांची सावली ही आधार देणारी नसून केवळ शोभेपुरतीच राहिल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

महापालिकेच्या २०२४-२५ पर्यावरण सद्यस्थिती अहवालानुसार शहरातील वृक्षसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे आढळत असली तरी झाडांची तोड आणि पुनर्लागवड यामधील तफावत चिंतेची बाब ठरत आहे. २०२०-२१ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शहरात एकूण १७ हजार ४७९ झाडांची तोड करण्यात आली. त्याच्या तुलनेत केवळ ४ हजार २४२ झाडांचीच पुनर्लागवड करण्यात आल्याची नोंद आहे.

झाडे ठरत आहेत प्रदूषणाचे कारण; संशोधनात झालेल्या खुलाशाने शास्त्रज्ञांनाही केले आश्चर्यचकित

शहरातील विभागनिहाय आकडेवारीनुसार धनकवडी-सहकारनगर परिसरात सर्वाधिक झाडे, तर कसबा-विश्रामबागवाडा परिसरात सर्वात कमी झाडे असल्याचे दिसून येते. तसेच आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ‘टिंबरवूड’ या वृक्षप्रजातीची संख्या सुमारे २२ लाख ४८ हजार ४५५ इतकी असून ती शहरातील सर्वाधिक आढळणारी प्रजाती आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, शहरात केवळ वृक्षसंख्या वाढविणे पुरेसे नाही. देशी व प्रदूषण शोषून घेणाऱ्या वृक्षप्रजातींची लागवड आणि विद्यमान झाडांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक आहे. अन्यथा पुण्यातील झाडांची सावली ही पर्यावरणाचा आधार न देता केवळ सौंदर्य वाढविणारीच ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वृक्ष गणनेतून वास्तव

(स्रोत – पुणे महापालिका पर्यावरण अहवाल)

वृक्ष वृक्षांची संख्या
२०१८-१९ ४१,९४,६२३
२०१९-२० ४१,९४,६२३
२०२०-२१ ४७,१३,७८१
२०२१-२२ ५१,०३,६०२
२०२२-२३ ५१,३७,६३२
२०२३-२४ ५५,८१,५७८
२०२४-२५ ५७,८१,५७८

पुनर्रोपणाची संख्या कमीच…

वर्ष पुनर्रोपण तोडलेली झाडे
२०२०-२१ ६७५ ३०६३
२०२१-२२ ९६० ८९८५
२०२२-२३. ५१९ १४००
२०२३-२४ १२८२ २७६३
ऑक्टोबर २०२४पर्यंत ८०६ १२६८
एकूण ४२४२ १७४७९

घरात झाडं लावण्याआधी जाणून घ्या शुभ आहेत की अशुभ

वृक्षगणना

ठिकाण २०२३-२४ २०२४-२५
औंध-बाणेर ६,९३,९९६ ४,५८,६९५
कोथरुड-बावधन ५,५६,८१८ ४,८८,९६५
शिवाजीनगर-
घोले रस्ता ५,१०,०३८ ४,७६,५४६
येरवडा कळस धानोरी ३,२४,४०० २,५६,४३०
नगर रस्ता –
वडगावशेरी ४,९८,७७८ ४,८६,०२५
हडपसर-मुंढवा ५,०७,२२९ ४,९९,७५७
कोंढवा-येवलेवाडी ३,३५,२३० २,२७,२४८
बिबवेवाडी १,२९,९९० १,२९,८५६
धनकवडी – सहकारनगर ११,९५,९८७ ११,९५,८९४
वारजे- कर्वेनगर २,६८,३५५ १,८९,२४१

२०२३-२४ एकूण – ५५,८१,५७८
२०२४-२५ एकूण – ५७,८१,५७८

Web Title: Pune city record 5 7 million trees but not benefiting environment navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • environment
  • pune news
  • Tree

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.