Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…

अर्ज करणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह इतर पक्षांतील मान्यवरांचाही समावेश आहे. या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यात आली असून त्यानुसार डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात मुलाखती घेतल्या जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 14, 2025 | 09:13 AM
Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…
Follow Us
Close
Follow Us:

भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात 
अर्जांची संख्या प्रचंड असल्याने उमेदवाराला अवघे चार ते पाच मिनिटेच वेळ 
भाजपकडे तब्बल २,५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात केली आहे. पक्षाशी असलेली एकनिष्ठा, प्रभागात केलेली कामे, जनसंपर्क, नागरिकांमधील प्रतिमा आणि मी उमेदवारीसाठी कसा किंवा कशी योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी अनेक इच्छुकांनी थेट पीपीटी प्रेझेंटेशन, कामांच्या फाइल्स आणि कागदपत्रांसह मुलाखतींना हजेरी लावली. मात्र, अर्जांची संख्या प्रचंड असल्याने प्रत्येक उमेदवाराला (Local Body Election) अवघे चार ते पाच मिनिटेच देण्यात आल्याने भाजपच्या या ‘फास्ट ट्रॅक इंटरव्ह्यू’मुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

पुण्यातील ४१ प्रभागांसाठी भाजपकडे तब्बल २,५०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जदारांच्या मुलाखती शनिवारी भाजपच्या शहर कार्यालयात सुरू झाल्या असून रविवारीही त्या सुरू राहणार आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि श्रीनाथ भिमाले यांनी या मुलाखती घेतल्या. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांनुसार विभागणी करून स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या. त्यात धीरज घाटे आणि गणेश बीडकर यांनी प्रत्येकी तीन, तर श्रीनाथ भिमाले यांनी दोन विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांची मुलाखत घेतली.

Maharashtra Politics: ‘आपली ताकद किती? MVA म्हणून…’; ठाकरेंच्या बैठकीत नेमके काय घडले?

या मुलाखती दरम्यान उमेदवारांची इच्छाशक्ती, आतापर्यंत केलेली कामे, प्रभागातील पकड, सामाजिक वर्चस्व, जनसंपर्क आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता याबाबत सविस्तर प्रश्न विचारण्यात आले. यंदा किमान १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले असून त्यासाठी सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचे पक्षनेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या मुलाखती केवळ औपचारिक न राहता, प्रत्येक इच्छुकाच्या राजकीय ताकदीची आणि कामगिरीची कसोटी ठरणार आहे.

अनेक इच्छुकांनी मी काय केलं यावर भर देत आपल्या कामांचा पाढा वाचला, तर काहींनी थेट प्रेझेंटेशनद्वारे आकडेवारी, छायाचित्रे आणि विकासकामांचे दाखले मांडले. काही इच्छुकांनी तर जाडजूड फाइल्स, अहवाल आणि कागदपत्रांचा गठ्ठा घेऊन मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र, इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने मुलाखतीचा कालावधी अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला. अवघ्या चार ते पाच मिनिटांत आपली बाजू मांडावी लागत असल्याने काही जण प्रश्नांच्या सरबत्तीने गोंधळले, तर काहींनी नेमकेपणाने आणि आत्मविश्वासाने उत्तरे देत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. काही इच्छुक मात्र ‘उमेदवारी मिळणारच’ या आत्मविश्वासात दिसत होते.

Maharashtra Politics: महापालिका निवडणुका MVA एकत्रित लढणार? ‘या’ नेत्याचे कार्यकर्त्यांना निर्देश

मुलाखतीनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. काहींच्या चेहऱ्यावर उमेदवारी जवळ आल्याचा आत्मविश्वास दिसत होता, तर काही जण ‘आपलं काही चुकलं तर नाही ना?’ या चिंतेत होते. चार मिनिटांत राजकीय भविष्य ठरणार का, असा सवाल अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत होता.
भाजपकडून यावेळी स्पष्ट संकेत देण्यात आले की, केवळ जुन्या ओळखी, पदे किंवा गटबाजीच्या जोरावर उमेदवारी मिळणार नाही. काम, जनसंपर्क, संघटनात्मक ताकद आणि जिंकण्याची क्षमता या निकषांवरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत उमेदवारीवरून चर्चा आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येणार, हे निश्चित मानले जात आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ९८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यंदा भाजप १२५ नगरसेवक निवडून आणण्याच्या तयारीत असून, २०१७ मध्ये काही मतांनी पराभूत झालेल्यांना पुन्हा संधी देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अर्ज करणाऱ्यांत माजी नगरसेवकांसह इतर पक्षांतील मान्यवरांचाही समावेश आहे. या अर्जांची प्राथमिक छाननी करण्यात आली असून त्यानुसार डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात मुलाखती घेतल्या जात आहेत, अशी माहिती निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांनी दिली. शहराध्यक्षांसह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित आहेत.
प्रभागनिहाय अर्ज
भाजपकडे एकूण २,५०० अर्ज प्राप्त झाले असून प्रभाग क्रमांक २९ मध्ये सर्वाधिक ९० अर्ज आले आहेत. प्रभाग क्रमांक २८ मध्ये ६०, तर प्रभाग क्रमांक २४ मध्ये ५८ अर्ज मिळाले आहेत. सर्वात कमी अर्ज प्रभाग क्रमांक ६ आणि १४ मधून प्रत्येकी १५ आले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये अर्जांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे.
आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको

भाजपबरोबरच पक्षाबाहेरील काही इच्छुकांनीही अर्ज भरल्याने शनिवारी व रविवारी होणाऱ्या मुलाखतीत पक्षाबाहेरील माजी नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. आमच्या मुलाखती सर्वांसमोर नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक जण भाजपच्या वाटेवर असून, त्यापैकी काहींचा प्रवेश पुढील आठवड्यात वरिष्ठांच्या सूचनेनुसार होईल, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

Maharashtra Politics: मतदार जोमात पुढारी कोमात! उमेदवार गॅसवर; ‘या’ नगरपालिकेत काय होणार?

मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने शनिवारी आणि रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उमेदवारांचा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामे आणि निवडून येण्याची क्षमता याचा विचार करूनच तिकीट दिले जाणार आहे.
– धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: Pune corporation elections bjp received 2500 applications for 41 wards maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 09:13 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • pune news

संबंधित बातम्या

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार
1

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय
2

पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार?; सोमवारी घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
3

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप
4

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात येणार भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.