उद्धव ठाकरे यांनी घेतला निवडणुकीचा आढावा (फोटो- सोशल मीडिया)
21 डिसेंबरला जाहीर होणार निवडणुकीचा निकाल
उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीचा घेतला आढावा
पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतल्याची शक्यता
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर झळा. त्यापैकी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक पार पडली आहे. 21 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हजारो उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या अंत सर्व निवडणूक घ्याव्या लागणार आहेत. दमर्याण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यानी बैठक घेतल्याचे समोर आले आहे.
राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. आज पक्षाच्या नेत्यांची बैठक त्यांनी घेतल्याचे समोर आले आहे. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांची बैठक घेतल्याचे समोर आले आहे.
राज्यभरात आपल्या पक्षाची ताकद किती आहे, याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी केल्याचे समजते आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष राज्यातील आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीचा आढावा देखील उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे समजते आहे.
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपले उमेदवार सक्षम आहेत का? मविआचा उमेदवार म्हणून त्याला लोकांची सहमति आहे का? बूथस्तरावर ताकद किती? असा सर्व प्रकारचा आढवा ठाकरे यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांनी जिल्हा आणि संपर्क प्रमुखांना काही महत्वाच्या सूचना देखील केल्याचे समजते आहे.
विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर
गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळत आहे. सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत ४० हून अधिक आमदार फोडत भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीतही फूट पडली. अनेक आमदारांसह बाहेर पडत अजित पवार यांनीही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण विरोधी पक्ष नेतेपदासाठी आतापर्यंत भास्कर जाधव प्रबळ दावेदार मानले जात होते. पण आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.






