Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘MPSC’ प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात ४० लाखांची मागणी करणाऱ्यांना कोर्टाचा दणका; दिला ‘हा’ निर्णय

परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे परिक्षेपुर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2025 | 05:36 PM
Pune Crime: ‘MPSC’ प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात ४० लाखांची मागणी करणाऱ्यांना कोर्टाचा दणका; दिला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या पूर्व परिक्षेच्या प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडे ३५ ते ४० लाखांची मागणी केल्या प्रकरणात चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी हा आदेश दिला. दीपक दयाराम गायधने (वय २६, रा. नाणेकरवाडी, चाकण. मुळ रा. तामसवाडी, भंडारा), सुमीत कैलाश जाधव (वय २३, रा. रानोबाई मळा, चाकण. मुळ रा. वेहेगाव, नाशिक) योगेश सुरेंद्र वाघमारे (वय २७, रा. सोनुली वरठी, भंडारा), दीपक यशवंत साकरे (वय २७, रा. गाव टेकडी, मध्य प्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी चौघांनी न्यायालयात अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील निलीमा यादव-इथापे यांनी विरोध केला. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा तसेच आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे परिक्षेपुर्वी एमपीएससी आयोगाबाबत विद्यार्थी व त्यांचे पालक यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आरोपींना जामीन मंजूर झाल्यास ते गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी हजर न राहण्याची शक्यता आहे. याखेरीज, या गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणून गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ॲड. इथापे यांनी केला.

परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. दिपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा,सोनाली ता. वराठी, जि.भंडारा) याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एम.पी.एस.सीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.

Crime News Pune: MPSC परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे आमिष दाखवत 40 लाखांची मागणी; तिघांना अटक

रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती.

 

Web Title: Pune court refuse bail 4 people about demand 40 lakhs bribe to mpsc question paper exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • crime news
  • MPSC Exams
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.