Photo Credit- Social Media एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तिघांना अटक
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांनी याची दखल घेत चाकणमधून दोघांना अटक केली. तर, त्यांच्या दोन साथीदारांना नागपूरमधून पकडले, दोन दिवसांपुर्वी हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, परीक्षेचा पेपर फुटला नसून, विद्यार्थ्यांनी काळजी न करता परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले होते. त्यानुसार, रविवारी पेपर सुरळीत पार पडला.
दिपक दयाराम गायधने (वय २६ वर्षे, चाकण, मूळ. रा. तुमसर जि. भंडारा), सुमित कैलास जाधव (वय २३, चाकण, मुळ रा. नांदगाव, जि.नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार योगेश सुरेंद्र वाघमारे (रा,सोनाली ता. वराठी, जि.भंडारा) याच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत एम.पी.एस.सीच्या सचिव सुवर्णा खरात यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे.
Phone tapping news: एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग..?; खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार व गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांनी गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या होत्या.
तांत्रिक तपासावरून पोलिसांनी काही तासांतच गायधने आणि जाधव यांना चाकण येथून पकडले. चौकशीत त्यांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे कबूल केले. त्यादृष्टीने दोघांना अटक केली. दोघेही चाकण येथील एका कंपनीत टेव्नीशिअन म्हणून कामाला आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत वाघमारेची माहिती मिळाली. वाघमारेने नाशिक येथील 24 उमेदवारांची यादी दोन आरोपींना दिली होती. यादीतील नाशिक जिल्ह्यातील नांदगावमधील दोन विद्यार्थ्यांना फोन कॉलही केले होते. त्यानूसार पुणे पोलिसांनी नागपूर येथून वाघमारेला ताब्यात घेतले. दरम्यान, चाकणमधील दोघांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना फोन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तर, इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही असे फोन केल्याची शक्यता आहे.
DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील
दऱम्यान, वाघमारे त्याचा साथीदार व गायधन आणि जाधव या चौघांसोबतच आणखी दोघांची नावे समोर आले आहेत. हे चौकशीतून समोर आले असून, त्या दोघांचा युद्धपातळीवर तपास सरू आहे. त्या दोघांकडे खऱ्या अर्थाने ठोस पुरावा मिळण्याची शक्यता आहे विदयार्थ्यांना अमिष दाखविणारे फोन कॉल करून अफवा पसरविली. विद्यार्थी पालक व सामान्य लोकांमध्ये संभ्रम व भिती पसरविली तसेच परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा व फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी एमपीएससी परीक्षा देणार्या उमेदवारांची माहिती, नंबर मिळविले. मात्र, कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्याने त्यांचा पर्दाफाश झाला. आरोपींनी नेमके किती जणांना फोन केले, त्यासाठी त्यांना इतर कुणी मदत केली का, याबाबत पोलीस तपास करीत असून यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.