पुण्यामध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले असून उपमहापौर परशुराम वाडेकर रस्त्यावर उतरुन काम केले (फोटो - सोशल मीडिया)
Pune Rain News :पुणे : अवकाळी पावसाने सलग दोन दिवस पुणेकरांना झोडपले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाचा तब्बल 130 वर्षांचा विक्रम या दोन दिवसाच्या पावसाने मोडून काढला आहे. (Pune News) यामुळे घडलेल्या झाडपडीसारख्या, रस्त्यावर पाणी साचणे आणि ड्रेनेज तुंबण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. रस्त्यांना ओढ्या नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले. कचराकुंड्यांमध्ये पाणी जाऊन कचऱ्याचा चिखल झाला. ही निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर स्वतः रस्त्यावर उतरले.
कमी कालावधीमध्ये जोरदार वाऱ्यांसह शहरात वादळी पाऊस झाला. तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबण्याचे प्रकार घडले. या विषयीच्या अनेक तक्रारी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे येऊ लागल्या. या परिस्थितीत वेगाने कामे करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून महापालिकेचा उद्यान विभाग, सफाई कर्मचारी यांना सूचना देऊन यांच्यामार्फत वेगाने कामे मार्गी लावली.
हे देखील वाचा : पावसाळी कामांचा हिशेब द्या, चार वर्षातील केलेली कामे दाखवा; महापालिका आयुक्तांकडे माजी पदाधिकाऱ्यांची मागणी
या विषयी माहिती देताना वाडेकर म्हणाले, “या पावसामुळे ज्या ठिकाणी ड्रेनेज तुंबळे, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठणे असे प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहेत. तसेच घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडले अशा सर्व ठिकाणांची नोंद घेण्यात आली असून या पुढील पावसाळ्यात किंवा अवकाळी पावसाच्या वेळी नागरिकांना पुन्हा या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करण्यात येतील,” असे वाडेकर यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “बोपोडी परिसरातील पठाण चाळ बोपोडी 53, 54 हायवे जवळील वसाहत, बोपोडी सर्वे क्रमांक 26 येथील तक्रारी काढून घेण्यात आल्या आहेत. विविध ठिकाणाचा कचरा काढून घेण्यात आला आहे. त्यामध्ये मटन मार्केट, दूध भट्टी, मारुती मंदिर परिसर व औंध रोड परिसरात असे अनेक ठिकाणी मधील कचरा काढून स्वच्छ करून घेण्यात आले,” असेही वाडेकर यांनी सांगितले.
हे देखील वाचा : छ. संभाजीनगर मनपाचा सावळा गोंधळ! मालमत्ता कर सवलतीसाठी झुंबड, पण पहिल्याच दिवशी वेबसाईट ‘क्रॅश’
महापौरांनी चार वर्षाचा अहवाल मागवला
अवकाळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुणे शहरात निर्माण झालेल्या परीिस्थतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात पावसाळी लाईनची कामे कितपत झाली, ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या






